अकोला: गुरुवारी शहरातील हजारो महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून, झाडाला सात फेर्या घालून सात जन्मी हाच पती मिळू दे, अशी मागणी करीत वटसावित्रीचा सण साजरा केला. देवी सावित्रीने आपल्या पतीप्रेमापोटी जो निस्सीम त्याग केला, त्याची आठवण म्हणून संपूर्ण देशभर वटसावित्रीचा सण साजरा केल्या जातो. पती वडाच्या झाडाप्रमाणे विस्तारलेल्या विचारांचा असू दे, त्याची मुळे बुद्धीच्या, धनसंपत्तीच्या, गुणांच्या खोलवर रुजलेली असू दे, वडासारखा धीरगंभीर, दृढ असू दे, अशी प्रार्थना केली जाते. शहरात कौलखेड, स्वराज्य पेठ, राणी सती धाम, जुने शहर, शास्त्री नगर तसेच ठिकठिकाणी वडाच्या झाडाजवळ गुरुवारी सकाळपासूनच महिलांची गर्दी दिसत होती. महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून आरती केली. तसेच आंब्याने महिलांची ओटी भरली.
महिलांनी साजरी केली वटसावित्री
By admin | Updated: June 13, 2014 18:52 IST