शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

झेंडावंदनापासून महिला दूरच;  निवडणूक आयोगाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:37 IST

पदाधिकारी महिलांना कमी लेखून राष्ट्रीय सणाच्या दिवशी झेंडावंदनापासून वंचित ठेवल्या जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे झाल्या आहेत.

अकोला : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यातून त्यांना सत्तेत सहभागाची संधी देण्यात आली; मात्र त्या पदाधिकारी महिलांनाच कमी लेखून राष्ट्रीय सणाच्या दिवशी झेंडावंदनापासून वंचित ठेवल्या जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे झाल्या आहेत. त्याची दखल घेत आयोगाने अमरावती विभागीय आयुक्तांकडून पाचही जिल्हा परिषदांचा अहवाल मागवला आहे.निवडणुकीनंतर ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी कारभाराच्या धोरणाचा आढावा आयोगाने घेतला. त्यासाठी आयोगाने आपल्या स्तरावर माहिती घेतली. त्यामध्ये ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्य, पदाधिकारी महिलांनी अनेक तक्रारी केल्या. त्यावर उपाययोजना करण्यासाठी आयोगाने संबंधित यंत्रणांकडून माहितीही मागवली. सोबतच शासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली. शासनासह आयोगाने या तक्रारींबाबतचा अहवाल संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून मागवला. तसे पत्र विभागीय आयुक्तांना देण्यात आले; मात्र त्याबाबतचा अहवाल अद्यापही विभागीय आयुक्तांना सादर झालेला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे पंचायत विभाग, गटविकास अधिकाऱ्यांना बजावले आहे.- ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या तक्रारीग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना अपेक्षेप्रमाणे सन्मान दिला जात नाही. ही तक्रार प्रामुख्याने करण्यात आली. त्यासोबतच सरपंच व सदस्यांना मान्य असलेले मानधन, बैठकीचा भत्ता वेळेवर दिला जात नाही. ही बाबही अन्यायकारक आहे.त्याशिवाय, आयोगाने गांभिर्याने घेतलेल्या तक्रारीत झेंडावंदनाचा मुद्दा गंभीर आहे. १ जानेवारी २००३ रोजीच्या शासन निर्णयानुसार स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व महाराष्ट्र दिन कार्यक्रमात ग्रामपंचायतींच्या महिला सरपंचांना झेंडावंदनाची संधी दिली जात नाही. ही बाब महिलांच्या अधिकाराला ठेच पोहोचवणारी आहे. त्यामुळे यापुढे खबरदारी घेण्यासाठी आयोगाकडूनच उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठीचा अहवाल मागवण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगgram panchayatग्राम पंचायत