शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची दागिन्यांची पर्स लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 02:52 IST

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट; गुन्हा दाखल

अकोला : लग्नासाठी बाहेरगावी जाणार्‍या महिलेची एसटी बसमधून सोन्याच्या दागिन्यांची पर्स लंपास झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. लग्नसराईचे दिवस आणि उन्हाळी सुट्टय़ांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. एसटी बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी धडपड करीत आहेत. याचा फायदा बसस्थानकावर सक्रिय असलेले चोरटे घेत आहेत. दररोज बसस्थानकावर चोरीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी एका प्रवाशाने मोबाइल चोरताना रंगेहात पकडल्याची घटना घडत नाही तो, पुन्हा रविवारी चोरट्याने महिलेची दागिन्यांची पर्स लंपास केली. डाबकी रोडवरील गुरुदेवनगरात राहणार्‍या अलका सुरेंद्र मोरे (३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कार्ला येथे लग्नकार्यात जाण्यासाठी त्या त्यांची आई शोभा पुंडकर यांच्यासोबत नवीन बसस्थानकावर आल्या. बसस्थानकावरील अकोला ते परतवाडा एसटी बसमध्ये त्या चढल्या. बसगाडीमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी असल्याने, त्यांच्या खांद्यांवर लटकवलेली पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार नोंदविली. चोरट्याने लंपास केलेल्या पर्समध्ये सोन्याचा गोफ, सोन्याचे मणी, दोन अंगठी, गळय़ातील लॉकेट असे एकूण ३७ हजार ६00 रुपये किमतीचे दागिने होते. सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.