शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांवर रोख काढणारे निवडणूक आयोगाच्या 'रडार'वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:07 IST

अकोला : दोन लाखांवर रोख काढणाऱ्या प्रत्येक बँक खातेदाराची नोंद थेट निवडणूक आयोगाकडे दररोज रेकॉर्ड होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- संजय खांडेकरअकोला : दोन लाखांवर रोख काढणाऱ्या प्रत्येक बँक खातेदाराची नोंद थेट निवडणूक आयोगाकडे दररोज रेकॉर्ड होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन लाखांवर रोख रक्कम काढणारे निवडणूक आयोगाच्या रडारवर असल्याने अनेकांची चौकशी होण्याचे संकेत आहेत.राष्ट्रीयीकृत बँका, शेड्युल बँका, को-आॅपरेटिव्ह बँकेतून दररोज कोट्यवधीची रोख उलाढाल होत असते. स्थानिक बँकेतून ही माहिती मुख्य शाखेला देणे कामाचा दैनंदिन भाग असतो; मात्र जेव्हापासून बँकेचे व्यवहार संगणीकृत आणि आॅनलाइन बँकिंग पद्धतीने जोडले गेले, तेव्हापासून प्रत्येक स्थानिक बँकेची दैनंदिन माहिती मुख्य शाखेला द्यावी लागत असे. त्यानंतर दोन लाखांवर जर कुण्या बँक खात्यातील रक्कम काढली जात असेल किंवा टाकल्या जात असेल, तर त्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देणे २०१२ च्या नियमावलीनुसार बंधनकारक केली. त्यामुळे २०१२ नंतर दोन लाखांवर होणाऱ्या प्रत्येक उलाढीलीची नोंद तांत्रिक यंत्रणेतून तातडीने पोहोचत आहे; मात्र निवडणूक आयोगाने अलीकडे रिझर्व्ह बँकेचा डेटा स्वत:कडे लिंक करून घेतल्याने आता स्थानिक बँकेत होत असलेली उलाढालदेखील आयोगाकडे तातडीने पोहोचत आहे.  लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे बँक खाते आणि त्यांच्या नातेवाइकांची माहिती टिपण्याचे संकेत बँक शाखाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे बँक अधिकारी उमेदवारांच्या खात्यावर लक्ष ठेवून आहेत; पण उमेदवाराच्या नातेवाइकांवर लक्ष तरी कसे ठेवावे, हा पेच अधिकाºयांना पडला आहे.

 दोन लाखांवर बँकेतून कॅश काढणाºया प्रत्येकाची माहिती रिझर्व्ह बँके कडे आपसूकच जाते. २०१२ पासून बँकिंग क्षेत्रातील तांत्रिक यंत्रणेत त्या प्रकारचा बदल केलेला आहे. आरबीआयने ही यंत्रणा निवडणूक आयोगाशी जोडली आहे. जर या व्यवहारासंदर्भात काही संशय जाणवत असेल, तर आयटी विभागाकडून थेट संबंधित बँक मॅनेजरला नोटीस येते.- आलोककुमार तरेनिया, एलडीएम, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगbankबँक