शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाइन बारला देशी दारू दुकानांचे स्वरूप!

By admin | Updated: April 17, 2017 01:59 IST

मद्यपींची गत केविलवाणी: अवैध विक्रीला ऊत

अकोला: दारू पिली की अंगात जोश संचारल्यासारखा मद्यपी वागतो. दारू अंगात भिनायला लागली की मद्यपी कोणतेही धाडस करायला तयार होतो; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शहरातील ५६ पैकी ६ वाइन बार, २ वाइन शॉप सुरू आहेत. त्यामुळे आता बारमध्ये ऐटीत बसून दारू पिणाऱ्या मद्यपींचा तोरा पुरता उतरला आहे. दारूसाठी मद्यपी लाचार झाल्याचे दिसून येत आहेत. वाढत्या गर्दीमुळे वाइनबारला सुद्धा देशी दारू दुकानांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५00 मीटर क्षेत्रात येणारे शहरात ९५ टक्के बार, शॉप, देशी दारूच्या दुकानांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका बसला आहे. शहरामध्ये १0२ पैकी १६ वाइन बार, शॉप, बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने सुरू आहेत. त्यातही सुरू असलेली सहाच वाइन बार आहेत आणि दोनच वाइन शॉप आहेत. त्यामुळे या वाइन बार आणि शॉप संपूर्ण शहरातील मद्यपींचा गर्दी गोळा होत आहे. गर्दी होत असल्यामुळे बार मालकांना मद्यपींना लवकर आटोपते घेण्याची विनंती करण्यात येत आहे. मद्यपींना वाइनबार, शॉपसमोर रांगेत उभे राहावे लागत आहे. सुरुवातीला ऐटीत आणि टोळक्यात गप्पाटप्पा करीत बसून मद्यपी दारूचा प्याला रिचवायचे आणि हव्या असलेल्या ब्रांडची वेटरकडे आॅर्डरकडे करायचे; परंतु आता ते दिवस संपल्यासारखे वातावरण बारमध्ये दिसत आहे.दारूची आॅर्डर देण्यासाठी मद्यपींना सातत्याने वेटरला बोलवावे लागत आहे. बार कमी आणि मद्यपी जास्त अशी काहीशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झाली आहे. प्रचंड गर्दी होत असल्याने, बार मालकांनी टेबलजवळील खुर्च्याही काढून टाकल्या आहेत. टेबलसमोरच उभे राहून मद्यपींना दारूचे प्याले गळी उतरावे लागत आहेत. मद्यपींची स्वयंसेवा...बार, वाइन शॉप म्हटले की, मद्यपी दारूच्या नशेत शिव्या हासाडायचे. वाद घालायचे; परंतु ५६ पैकी ६ बारच शहरात सुरू असल्याने मद्यपींचा तोरा पूर्णत: उतरला आहे. गर्दीमुळे टेबलजवळ उभे राहून, धक्काबुक्की सहन करीत आणि एकाच प्लेटमधील स्नॅक्स खात दारू प्यायची वेळ त्यांच्यावर आली आहे. बारमध्ये तासन्तास गप्पा मारीत दारू रिचविण्याचे तर दूर, आता बार मालकच दारू घ्या आणि लवकर टेबल खाली करून पुढील ग्राहकांना संधी द्या, असे सातत्याने सांगत आहेत. आधी पैसे दिल्याशिवाय दारूसुद्धा दिल्या जात नसल्याचे चित्र सर्वच बारमध्ये पाहायला मिळते. --