शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

जिल्हा परिषदेत पदाधिकारी विरुद्ध अधिकारी वाद पेटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:51 IST

जिल्हा परिषदेत पदाधिकारी-सदस्य विरुद्ध अधिकाºयांचा वाद चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

अकोला : जिल्ह्यातील शाळा इमारतींच्या दुरुस्तीचा निधी अखर्चित राहिल्याच्या मुद्यावर झालेल्या खडाजंगीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार शुक्रवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी सभागृह सोडल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेत पदाधिकारी-सदस्य विरुद्ध अधिकाºयांचा वाद चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेला निधी अखर्चित राहिल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विचारणा करण्यात आली. शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ५० लाख रुपये कामांच्या प्रस्तावावर २७ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे या कामांचा प्रस्ताव विहित वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे सादर होऊ शकला नसल्याने, अखर्चित निधी शासनाकडे परत करण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सभेत दिली. शिक्षण सभापतींनी दिलेल्या माहितीवर आक्षेप घेत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांनी चुकीचे आरोप करणे योग्य नसून, यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगत, अधिकाºयांना सभागृह सोडण्यास सांगितले होते. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनीदेखील अधिकाºयांना सभागृह सोडून जाण्याचे आवाहन केले. त्यानुसार सभेला उपस्थित जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी सभागृह सोडले. कॅफो आणि सीईओ यांच्या आवाहनानुसार अधिकाºयांनी सभागृह सोडल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेत आता पदाधिकारी विरुद्ध अधिकाºयांचा वाद चांगलाच पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.ग्रामविकास मंत्री, आयुक्तांकडे तक्रार करणार- सुलताने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सभागृह सोडण्याचे अधिकाºयांना आवाहन केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या ‘कॅफो’ आणि ‘सीईओ’ विरुद्ध ग्रामविकास मंत्री, मुख्य सचिव व विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात सोमवारी जिल्हा परिषदेतील गटनेत्यांसोबत चर्चा करून पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सांगितले.

अधिकाºयांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही - डॉ. पुंडकर जिल्हा परिषदेत अधिकाºयांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही आणि मुजोर अधिकाºयांना वठणीवर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.चौकशीत सत्य बाहेर येईल-सीईओलोकशाहीत कोणीही कोणाविरुद्ध तक्रार करू शकते. त्यामुळे आमच्याविरुद्ध तक्रार करण्यास हरकत नाही. तक्रारीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुभाष पवार यांनी दिली.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद