शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहकार चळवळ मजबूत करण्यास प्राधान्य- विनायक कहाळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 21:19 IST

सहकार चळवळ मजबूत करण्यास प्राधान्य देणार असल्याचे मत जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

- प्रशांत विखेतेल्हारा : जिल्ह्यातील सहकाराचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करावयाचे असेल, तर सहकार क्षेत्रातील विविध कार्यकारी सोसायट्यांपासून नागरी व बिगर नागरी पतसंस्था, बँका, विविध संस्था, बाजार समित्यांच्या सभासद व संचालक मंडळ यांनी पुढाकार घेऊन सर्वसामान्य व शेतकऱ्यांना प्रवाहात आणणे गरजेचे आहे. शासन प्रतिनिधी म्हणून सहकार चळवळ मजबूत करण्यास प्राधान्य देणार असल्याचे मत जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.सहकारात अनेक प्रश्न कायम असताना आपण कशाला प्राधान्य देणार?सर्वप्रथम प्राधान्य हे शेतकºयांच्या कर्जमाफीला राहणार आहे. अनेक पुनर्गठित शेतकºयांना नव्याने कर्ज मिळाले नाही. याबाबत मंत्रालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती घेण्यात आली असून, या शेतकºयांना लवकरच कर्ज वितरित केले जाणार आहे.  नगर परिषद क्षेत्रातील मालमत्तावर नगर परिषद बोजा चढवित नाही त्यामुळे अडचण होत आहे. आपण काय करणार?ग्रामीण भागात ग्रामपंचायत बोजा चढवित नसल्याने कुठलीही बँक किंवा पतसंस्था कर्ज देण्यास तयार होत नव्हत्या. परिणामी या नागरिकांना मालमत्ता असल्यावरही कर्ज मिळत नव्हते; मात्र शासनाने मंजुरी दिल्याने आता या नागरिकांना खासगी कामाकरिता कर्ज मिळणार आहे. असे असताना नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेवर ज्या नगरपालिका बोजा चढवित नाही, असे प्रकरण अद्यापही माझ्याकडे आले नाही. बँका व पतसंस्था यांना अशा प्रकारच्या अडचणीचा प्रस्ताव आल्यास यासंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे.  नाफेड खरेदीसंबंधी पुढील धोरण काय असणार?नाफेड खरेदीमुळे सहकार क्षेत्रातील संस्थांना आर्थिक बळकटी मिळते. त्याला संबंधित संस्थेच्या सर्व संचालकांनी व सभासदाचे सहकार्य अपेक्षित आहे. काही कारणांमुळे खरेदी लांबणीवर पडून शेतकºयांना पैसे विलंबाने मिळत असतील किंवा काही शेतकरी वंचित राहत असतील, तर अशा ठिकाणी काही नवीन पर्यायसुद्धा निवडता येऊ शकतो. विचाराअंती निर्णय घेण्यात येईल. सहकारी बँका व पतसंस्थांच्या निवडणुका कोरोना काळात कधी होतील?ज्या संस्था, बँका व पतसंस्था यांचा संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा संस्था व बँका, पतसंस्था यांच्या संचालक मंडळाला शासनाने ३० सप्टेंबर मुदतवाढ दिली आहे; परंतु तरीही सध्या कोरोनाचे संकट असल्याने निवडणूक घेणे शक्य नाही. शासन पुन्हा मुदत वाढ देऊ शकते. नव्याने तयार झालेल्या नियामक मंडळाची भूमिका काय?यापूर्वी सहकार क्षेत्रातील सर्व संस्था, बँका व पतसंस्था यांच्या निवडणूक घेण्याचे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्याचे अधिकार त्या संस्थेचे कार्यक्षेत्र बघून तालुका किंवा जिल्हा उपनिबंधक यांना होते; मात्र आता हे सर्व अधिकार प्राधिकरण नियामक मंडळ यांना देण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्तीचे अधिकारसुद्धा प्राधिकरण यांना आहेत; मात्र त्यानंतर नियंत्रण ठेवून जमा-खर्च मंजुरीचे अधिकार तालुका स्तरावरील सहा. निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत