शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाणीपुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: November 22, 2014 02:00 IST

लोकमत संवाद कार्यक्रमात गोवर्धन शर्मा यांचे आश्‍वासन.

अकोला : सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाण पूल, स्वच्छता, वीज, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सुविधांपासून दूर असलेल्या अकोला शहराच्या विकासाच्या दृष्टीने विधानसभेच्या अकोला पश्‍चिम मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शुक्रवारी ह्यलोकमतह्ण संवाद कार्यक्रमात मनमोकळी चर्चा केली. मंत्रिपदापेक्षा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधी खेचून आणण्यात आपल्याला रस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी मतदारसंघात राबविण्यात येणार्‍या विविध विकास योजनांसोबतच शहरातील राजकारणावर लोकमतच्या संपादकीय विभागातील सहकार्‍यांशी दिलखुलास चर्चा केली.

प्रश्न : शहराला नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराल ?आ. शर्मा : मोर्णा प्रकल्पातून अकोला शहरात पाईप लाईन टाकण्यासाठी ४0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही योजना मंजूर झाल्यास पाणी पुरवठय़ाचा प्रश्न मार्गी लागेल.

प्रश्न : अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यावर कायमस्वरुपी तोडगा कसा काढता येईल?आ. शर्मा : मनपाने शहरात हॉकर्स झोन तयार करावेत. यासाठी मनपाने प्रस्ताव दिल्यास आमदार कोट्यातून अथवा शासनाकडून मदत मिळवून देऊ. अतिक्रमण मोहिम एकतर्फी राबविल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. परिणामी बेरोजगार युवक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रश्न : सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमच्या कोणत्या योजना आहेत?आ. शर्मा : शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी दोन उड्डाण पूल आणि २0 पेक्षा जास्त रस्ते बांधण्याचे नियोजन आहे. यापूर्वी राज्यात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ विरोधीपक्षाची सत्ता होती. त्यामुळे निधी कमी मिळत होता.मात्र आता राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने निधीसाठी प्रयत्न करु.

प्रश्न : आपण सलग पाचव्यांदा निवडून आलात; आपल्या यशाचे गमक काय?आ. शर्मा : मी दोनवेळा नगर परिषद आणि पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकलो. प्रत्येक वॉर्डाचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले. वॉर्डातील समस्या सुटण्यासाठी थेट नागरिकांशीच संपर्क साधला. वॉर्डात रस्ते, पथदिवे, स्वच्छता आणि सभागृहांसाठी भरीव निधी दिला. १८ कोटी ५0 लाख रुपये खर्च करुन पूर संरक्षण भिंत बांधली. नवीन दगडी पूल बांधला. महामार्गाच्या चौपदरीसाठी प्रयत्न केले. जुने शहरात विद्युत उपकेंद्र आणले. वाण धरणातील पाणी अकोला शहरात आणण्यासाठी पाईप लाईन टाकली. मी रामनवमी शोभा यात्रा उत्सव समितीचा सर्वसेवाधिकारी या नात्याने केवळ अकोला शहरातीलच नव्हे ,तर जिल्ह्यातील गरजूंना मदतीचा हात दिला.राजकारणात मी कधीही कोणावर आरोप-प्रत्यारोप केले नाही. मी नेहमीच माणसं जोडण्यासाठी प्रयत्न करतो. राजकारणात जनतेच्या विश्‍वासला तडा जाईल, असे एकही कृत्य माझ्या हातून घडलेले नाही आणि घडणारही नाही.

प्रश्न : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असल्याचे त्याचा परिणाम उद्योगावरही होत आहे. त्यावर काही ठोस उपाय शोधता येतील काय ?आ. शर्मा : गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. शहरात आमदार निधीतून ७ पोलिस चौकी बांधून दिल्या होत्या. त्यापैकी आज केवळ एकच पोलिस चौकी सुरु आहे. पोलिस दलातच अमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे अकोल्यात पोलिस आयुक्तालय मंजूर करण्याची मागणी केली होती. आता राज्यात भाजपची सत्ता असल्याने पोलिस आयुक्तालयासाठी प्रयत्न करु.