शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक जन्म-एक वृक्ष’चा अकोला पॅटर्न राज्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 17:54 IST

 अकोला : अकोला जिल्ह्यात गतवर्षभरापासून सुरु असलेला ‘एक जन्म एक वृक्ष’चा पॅटर्न लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे.

ठळक मुद्दे‘एक जन्म- एक वृक्ष’ मोहिमेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त संचालक सतिष पवार यांनी दिल्या आहेत. तामिळनाडू राज्यातील सामाजिक कार्यकर्ता ए. एस. नाथन हे वर्ष २०१५ पासून अकोला जिल्ह्यात वृक्षसंवर्धनासाठी झटत आहेत.आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींनी १४ मे रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक सतीष पवार यांच्या मुंबई येथील कार्यालयात या योजनेचे सादरीकरण केले.

- अतुल जयस्वाल

 अकोला : अकोला जिल्ह्यात गतवर्षभरापासून सुरु असलेला ‘एक जन्म एक वृक्ष’चा पॅटर्न लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे. तामिळनाडू राज्यातील सामाजिक कार्यकर्ता तथा भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी अकोला जिल्ह्यात २०१७ मध्ये सुरु केलेल्या ‘एक जन्म- एक वृक्ष’ मोहिमेची अंमलबजावणी आशा स्वयंसेविकांमार्फत संपूर्ण राज्यात जून २०१८ पासून करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्त संचालक सतिष पवार यांनी दिल्या आहेत. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना २१ मे रोजी पत्र पाठविण्यात आले आहे.तामिळनाडू राज्यातील सामाजिक कार्यकर्ता ए. एस. नाथन हे वर्ष २०१५ पासून अकोला जिल्ह्यात वृक्षसंवर्धनासाठी झटत आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून आॅक्टोबर २०१७ मध्ये आरोग्य विभागामार्फत ‘एक जन्म एक वृक्ष’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. या मोहिमेअंतर्गत ज्या कुटुंबात नवजात बालकांचा जन्म होईल, त्या कुटुंबाच्यावतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते. या वृक्षाचे जतन करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका त्या कुटुंबास प्रोत्साहित करत असून, या प्रयोगामुळे जिल्ह्यात वृक्ष लागवडीस मदत होत आहे. अकोला जिल्ह्यातील या उपक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात व्हावी, यासाठी आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींनी १४ मे रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक सतीष पवार यांच्या मुंबई येथील कार्यालयात या योजनेचे सादरीकरण केले. अभियान संचालकांनी या उपक्रमाची दखल घेऊन संपूर्ण राज्यात ‘एक जन्म एक वृक्ष’ योजनेची अंमलबजावणी आशा स्वयंसेविकांमार्फत करण्यात यावी, अशी सूचना राज्यभरातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना केली आहे. या योजनेसाठी मार्गदर्शक सूचना त्यांनी एका परिपत्रकाद्वारे जारी केल्या आहेत. त्यामुळे लवकरच ‘एक जन्म एक वृक्ष’चा अकोला पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू होणार आहे.काय आहेत सूचना ?* आशा स्वयंसेविकेने गर्भवती महिला असलेल्या कुटुंबातील सदस्यांना प्रसुतीनंतर एक झाड लावण्यास प्रवृत्त करावे.* जे नाव बाळाला देणार असेल, तेच नाव वृक्षाला देण्यात यावे, जेणेकरून आपुलकी निर्माण होईल.* बाळाच्या वाढदिवसासोबतच वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्याकरीता कुटुंबास प्रवृत्त करावे.* आशा स्वयंसेविकेने वेळावेळी भेट देऊन वृक्षाची पाहणी करावी.* दरमहा किती वृक्षांची लागवड करण्यात आली याचा आढावा कार्यालयामार्फत घेण्यात यावा.* जिल्हास्तरावर घेतलेला अहवाल राज्यस्तरावर पाठविण्यात यावा. 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद