शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास चौकटीबाहेर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणार - कृषी मंत्री दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:23 IST

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती दिन व चर्चासत्रात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी शेतकरीभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, गरज पडल्यास नियमाच्या काही चौकटीबाहेर जाऊन शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी दिली.जिल्ह्यातील अकोला तालुक्यात घुसर येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती दिन व चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, पवन बुटे, पंचायत समिती सदस्य बाळू गव्हाळे, घुसरच्या सरपंच निर्मला गवळी, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे विषय तज्ज्ञ रफीक नाईकवाडी, कीटकशास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त ठिपसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तहसीलदार विजय लोखंडे व तालुका कृषी अधिकारी शलाका सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. खारपाणपट्ट्यातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी दिली.शेतकºयांना पीक कर्ज, नाला खोलीकरण, मत्स्य शेती, तलावांचे पुनर्भरण इत्यादी कामांसंदर्भात खारपाणपट्ट्यातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचेही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार कृषी पर्यवेक्षक एन. डी. वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला घुसर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.महिला मजुरांच्या जाणून घेतल्या समस्या!नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत घुसर येथील शेतकरी नंदलाल डहाके यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या बीजोत्पादन क्षेत्राला कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच तात्याराव चोपडे यांच्या शेतात कीड नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्यांची पाहणी त्यांनी केली. वाकी येथील शेतकरी कैलास गोटे यांच्या शेतात कापूस वेचणी करणाºया महिला मजुरांसोबत कृषी मंत्र्यांनी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दोन लाखांवरील थकीत कर्जासंदर्भात अहवाल लवकरच शासनाकडे!शेतकºयांचे दोन लाख रुपयांवरील थकीत कर्ज आणि नियमित कर्ज माफ करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी शासनामार्फत उपसमिती नेमण्यात आली असून, या उपसमितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर यासंदर्भात शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती