शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी वन्य प्राण्यांना संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:27 IST

वन विभागाच्या आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देवन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तात रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत.कोरोनाची लागण वन्य प्राण्यांना होऊ नये म्हणून प्रत्येक गेटवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वन विभागाच्या आरक्षित जंगलामध्ये मुक्त संचार करीत असलेल्या वन्य प्राण्यांना ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य विषाणूंचा धोका होण्याची शक्यता लक्षात घेता, वन विभागाच्या लक्षात येताच वन विभागाच्या आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे जगभर थैमान माजले आहे. वीस लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोक या आजाराने ग्रासले आहेत. अशातच कोरोना या संसर्गाचा धोका वन्य प्राण्यांना होऊ शकतो, हे निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या वन विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी तातडीने पावले उचलत आरक्षित जंगलांमधील वन्य प्राण्यांना या संसर्गजन्य विषाणूपासून वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.याच आधारे जिल्ह्यातील आरक्षित जंगलांमध्ये वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथकच कडेकोट बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या बंदोबस्तात रात्रंदिवस खडा पहारा देत आहेत.

जंगलांमध्ये ‘अलर्ट’ जारीदरम्यान, कोरोनापासून वन्य प्राण्यांच्या रक्षणासह वन तस्करांवर नजर ठेवण्यासाठी आता वन विभागाच्या जंगलामध्ये ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मे महिन्यापर्यंत हा अलर्ट राहणार असून, वन तस्करांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच या दरम्यानच कोरोनाची लागण वन्य प्राण्यांना होऊ नये म्हणून प्रत्येक गेटवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या वन्य प्राण्यांना संरक्षणासाठी प्रयत्नजंगलातील वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, हरीण, काळवीट यासह विविध वन्य प्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आली आहे. कोरोनाची लागण वन्य प्राण्यांना झाल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत.कोरोना या संसर्गजन्य विषाणूंपासून वन्य प्राण्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे जंगलातील बंदोबस्तही अधिक कडक करण्यात आला असून, वन्य प्राण्यांना संरक्षण पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. वाघ, बिबट, अस्वल यासह विविध वन्य प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी झटत आहेत.- विजय माने,उपवनसंरक्षक, अकोला वन विभाग.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागAkolaअकोला