शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा उच्छाद; हरभरा उगवण्यापूर्वीच ‘खल्लास’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:32 IST

हरभरा पेरणी झालेल्या शेतांमध्ये रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर जिल्ह्यात रब्बी हंगामातील हरभरा पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; मात्र रानडुकरांच्या उच्छादात पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच ‘खल्लास’ होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, कपाशी इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे उत्पादन अवकाळी पावसाने पळविल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; परंतु हरभरा पेरणी झालेल्या शेतांमध्ये रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच रानडुकरांचे कळप हरभरा बियाणे उखरुन फस्त करीत आहेत. पेरलेला हरभरा उगवण्याआधीच रानडुकरांच्या उच्छादात खल्लास होत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.

जीव धोक्यात टाकून शेतकºयांचे जागरण !हरभरा पेरणी झालेल्या शेतांमध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप उच्छाद मांडून पेरलेला हरभरा उखरुन फस्त करतात. त्यामुळे रानडुकरांच्या तडाख्यातून हरभरा वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकून जिल्ह्यात शेतकºयांना राजीच्या वेळी शेतांमध्ये जागरण करावे लागत आहे.

कुटार पेटवून, डबे वाजवून डुकरांना पळविण्याचे प्रयत्न !पेरलेला हरभरा रानडुकरांच्या तावडीतून वाचविण्यासाठी रात्रीच्या वेळी सामूहिकपणे शेतकºयांना शेतात जागरण करावे लागत आहे. शेताच्या धुºयावर कुटार आाणि काडीकचरा पेटवून तसेच डबे वाजवून शेतात येणाºया रानडुकरांना पळविण्याचे प्रयत्न शेतकºयांकडून करण्यात येत आहेत.अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाले आहे. त्यानंतर रब्बी हंगामात शेतात पेरलेला हरभरा उगवण्यापूर्वीच रानडुकरांकडून फस्त करण्यात येत असल्याने, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतात पेरलेला हरभरा रानडुकरांपासून वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकून शेतकºयांना रात्रीच्यावेळी शेतात जागरण करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकºयांच्या शेतीला सामूहिकरीत्या संरक्षक कंपाउंड देण्याची उपाययोजना केली पाहिजे.-शिवाजीराव भरणे, शेतकरी,रामगाव, ता.अकोला.

११ एकर शेतात पेरलेला हरभरा उगवण्याआधीच रानडुकरांनी फस्त केला आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यानुषंगाने रानडुकरांमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.-सचिन गावंडेशेतकरी, केळीवेळी, ता.अकोट.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी