शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १८ मालमत्तांमुळे रखडले रोडचे रुंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:29 IST

अकोला: गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणाला अवघ्या १८ मालमत्ताधारकांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित मोजमाप केल्यानंतर मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे कोणत्याही क्षणी मनपाचा ‘जेसीबी’ चाल करण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणाला अवघ्या १८ मालमत्ताधारकांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित मोजमाप केल्यानंतर मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला न्यायालयाच्या कचाट्यात अडकविण्याचा प्रयत्न करणाºया मालमत्ताधारकांच्या इमारतींवर कोणत्याही क्षणी मनपाचा ‘जेसीबी’ चाल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.खड्ड्यांचे शहर ही ओळख पुसून काढण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. बांधकाम विभागामार्फत नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकपर्यंत एकूण २ हजार ६३१ मीटर अंतर व १५ मीटर रुंद रस्त्याच्या निर्माण कार्याला प्रारंभ करण्यात आला. गोरक्षण रोडवरील महापारेषण कार्यालय ते इन्कम टॅक्स चौक ते लक्ष्मी हार्डवेअरपर्यंतच्या ५०० मीटर अंतरावर रस्त्यालगतच्या मालमत्तांमुळे ‘बॉटल नेक’ (निमुळता भाग) तयार होण्याची चिन्हे आहेत. विकास आराखड्यानुसार गोरक्षण मार्गाची रुंदी २४ मीटर आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. विकास कामात सहकार्य करण्याऐवजी शहराच्या विविध भागात नियमांची पायमल्ली करून टोलेजंग इमारती उभारत स्वत:ची खिसे भरणाºया काही बिल्डरांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे.इमारती खाली करण्याची तयारीइमारतींचे मोजमाप घेतल्यानंतर काही मालमत्ताधारकांनी इमारती, दुकाने खाली करण्याची तयारी दर्शविली आहे. अवैध बांधकाम पाडल्या जाण्याचे निश्चित असल्याने त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेत न अडकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.नकाशापेक्षा दुप्पट बांधकामइन्कम टॅक्स चौकात काही प्रख्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाणिज्य संकुलांचे मंजूर नकाशापेक्षा चक्क दुप्पट, तीनपट अवैध बांधकाम केले आहे. ‘डीसी रुल तसेच हार्डशिप अ‍ॅण्ड कम्पाउंडिंग’च्या विषयावर मनपासह शासनाला सूचनांचे डोस पाजणाºया ‘के्रडाई’ संघटनेच्या पदाधिकाºयांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आहे. गोरगरिबांच्या झोपड्या, फेरीवाले, हातगाड्यांवर जेसीबी चालविण्याचे धाडस करणारे मनपा प्रशासन बड्या बिल्डरांच्या बांधकामावर कारवाई करणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.