शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदतीचे आणखी ४१९४ कोटी केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:49 IST

उपलब्ध मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, मागणीच्या तुलनेत आणखी ४ हजार १९४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

- संतोष येलकर

अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांना मदत वाटपासाठी ७ हजार १०३ कोटी ७९ लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी आहे. त्यापैकी शासनामार्फत आतापर्यंत दोन हप्त्यांमध्ये २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून, उपलब्ध मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, मागणीच्या तुलनेत आणखी ४ हजार १९४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून करण्यात येत आहे.शासनामार्फत दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील १५१ तालुक्यातील शेतीपिकांच्या नुकसान भपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी जिल्हानिहाय मागणीनुसार ७ हजार १०३ कोटी ७९ लाख रुपयांची मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतीपिकांच्या नुकसानासाठी ६ हजार ३९७ कोटी ५९ लाख रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी ७०६ कोटी २० लाख रुपयांच्या मदत निधीचा समावेश आहे. मागणीनुसार देय असलेल्या मदत निधीपैकी २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी दोन हप्त्यांमध्ये वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय शासनामार्फत २५ जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी मदत वाटपाच्या पहिल्या व दुसºया हप्त्यापोटी शासनामार्फत २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, विभागीय आयुक्त कार्यालयांमार्फत संबंधित जिल्हास्तरावर मदतनिधी वितरित करण्यात आला. दोन हप्त्यांमध्ये उपलब्ध मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, दुष्काळी मदत वाटपासाठी आवश्यक असलेला आणखी ४ हजार १९४ कोटी रुपयांचा मदत निधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबत दुष्काळग्रस्त शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.विभागनिहाय अशी आहे मंजूर मदतीची रक्कम!विभाग                                       रक्कम (कोटीत)कोकण                                       ३४.४९नाशिक                                      २१८०.०१पुणे                                            १००९.२८औरंगाबाद                                 २५६४.९१अमरावती                                  ११५८.११नागपूर                                      १५६.९०.................................................एकूण                                      ७१०३.७९

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना