शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदारांची माहिती कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 01:47 IST

कर्जमाफी : ‘एलडीएम’ने माहिती सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती राष्ट्रीयकृत बँकांमार्फत अद्यापही जिल्हा उपनिबंधकांकडे (डीडीआर) सादर करण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांकडून माहिती केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी (एलडीएम) गुरुवारी बँकांना दिले.राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात २८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयातील निकषानुसार १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकरी एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून, सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय शासनामार्फत ५ जुलै रोजी घेण्यात आला. त्यानुसार थकबाकीदार शेतकरी आणि ३० जून २०१६ व ३० जून २०१७ पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना गत २९ जून रोजी दिले. त्यानुषंगाने २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ५ जून रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आली; परंतु राष्ट्रीयीकृत बँकांच्या जिल्ह्यातील शाखांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अद्यापही सादर करण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडून जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती केव्हा सादर केली जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर थकबाकीदार आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी गुरुवारी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना दिले.जिल्हाधिकारी आज घेणार बँक अधिकाऱ्यांची बैठक!जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बँक अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. कर्जमाफी योजनेत पात्र ठरणाऱ्या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती, पीक कर्जाचे वाटप, पीक विमा योजना इत्यादी विषयांचा आढावा या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे.शासन निर्णयानुसार थकबाकीदार शेतकरी आणि कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले आहेत.- तुकाराम गायकवाडव्यवस्थापक, लिड बँक