शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चाके थांबली; बारा लाखांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:27 IST

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एस.टी.कामगार संघटनेने  मंगळवारी पुकारलेल्या संपामुळे सणासुदीत प्रवाशांचे हाल झालेत. सर्व आगारात शेकडो बसगाड्या अडकून पडल्याने एका दिवसात अकोल्यात बारा लाखांचे नुकसान झाले. संपाचा गैरफायदा घेत, दिवाळीच्या निमित्ताने गावाकडे  निघालेल्या प्रवाशांची खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मंगळवारी अक्षरश:लूट केली.

ठळक मुद्दे सणासुदीत प्रवाशांचे हाल सर्व आगारात अडकून पडल्या शेकडो बसगाड्या

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एस.टी.कामगार संघटनेने  मंगळवारी पुकारलेल्या संपामुळे सणासुदीत प्रवाशांचे हाल झालेत. सर्व आगारात शेकडो बसगाड्या अडकून पडल्याने एका दिवसात अकोल्यात बारा लाखांचे नुकसान झाले. संपाचा गैरफायदा घेत, दिवाळीच्या निमित्ताने गावाकडे  निघालेल्या प्रवाशांची खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मंगळवारी अक्षरश:लूट केली.

अकोला : विभागात ९ आगारातून ४१६ गाड्या दररोज प्रवाशांची वाहतूक करतात. तब्बल १ लाख ३0 हजार प्रवाशी एसटीच्या सेवेचा लाभ घेतात. आज ही सेवा ठप्प झाल्याने ४0 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

मूर्तिजापूर :  ग्रामीण क्षेत्रातील प्रवाशांना खासगी वाहनाने घर गाठण्याकरिता दुप्पट तिकीट द्यावे लागले. संपामुळे दररोज विविध ठिकाणांवरून येणार्‍या-जाणार्‍या २00 पेक्षा अधिक बसफेर्‍या रद्द झाल्या. 

तेल्हारा : तेल्हारा आगार व्यवस्थापक, लिपिक असे तीन कर्मचारी वगळता आगारातील ८३ चालक, ८८ वाहक, ३0 मेकॅनिक, सहा वाहतूक नियंत्रक, आठ लिपिक, दोन पर्यवेक्षक असे २१७ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

पातूर: पातूर बसस्थानकावर दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंंत जा-ये करणार्‍या लांब पल्ल्याच्या ७५ जलद, ७५ साधारण बसफेर्‍या तथा पातूर बसस्थानकाच्या पाच बसफेर्‍या संपूर्णत: रद्द झाल्या आहेत.

बाळापूर : बाळापूरात खासगी वाहनधारकांनी बाळापूर-पातूरचे प्रवास भाडे भरमसाट वाढवून ते दुप्पट केले.  

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ