शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसाठी ‘हॉटस् अ‍ॅप’द्वारे सल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 15:05 IST

अकोला : विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा ‘हॉट्स अ‍ॅप ग्रुप’ तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसंदर्भात सल्ला देण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देजात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गत २४ जुलै रोजी जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा ‘हॉट्स अ‍ॅप ग्रुप’ तयार करण्यात आला.

- संतोष येलकर

अकोला : विज्ञान शाखेतील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा ‘हॉट्स अ‍ॅप ग्रुप’ तयार करून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसंदर्भात सल्ला देण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी होणाऱ्या त्रासापासून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.विज्ञान शाखेच्या इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी अकोला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गत २४ जुलै रोजी जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा ‘हॉट्स अ‍ॅप ग्रुप’ तयार करण्यात आला. या ‘हॉट्स अ‍ॅप ग्रुप’द्वारे विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर तयार करावयाची प्रकरणे, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र यासंबंधीची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत प्राचार्यांना दिली जाते. विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तयार झाल्यानंतर, महाविद्यालयातील संबंधित कर्मचारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कर्मचाºयांकडून महाविद्यालयातच विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रस्तावांची छाननी करण्यात येते. प्रस्तावांच्या छाननीनंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत गत जुलैपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालय स्तरावरच जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारून प्रस्तावांची छाननी करण्यात येत असल्याने, जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात पडताळणी समिती कार्यालयात विद्यार्थ्यांची होणारी गर्दी थांबली असून, रांगेत उभे राहण्याच्या त्रासापासून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.कायदा, नियमांचीही दिली जाते माहिती!जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत जिल्ह्यातील प्राचार्यांच्या हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर जात वैधतासंदर्भात कायदा, शासनाचे नियम व इतर प्रकारची महत्त्वपूर्ण संबंधित माहितीदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर प्रस्ताव स्वीकारणे, छाननी प्रक्रिया तसेच जात वैधतासंदर्भात कायदा, शासनाचे नियम व इतर माहिती ‘हॉट्स अ‍ॅप ग्रुप’द्वारे जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिली जात आहे.-एस.आर. कदमउपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती

 

टॅग्स :AkolaअकोलाWhatsAppव्हॉट्सअॅप