शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

तुमचे आमचे नाते काय.. ‘जय जिजाऊ -जय शिवराय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 03:06 IST

अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवारी दुपारी शिवाजी पार्क परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुण-तरुणी मोठय़ा उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देशिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक विविध देखाव्यांनी वेधले अकोलेकरांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवारी दुपारी शिवाजी पार्क परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुण-तरुणी मोठय़ा उत्साहात सहभागी झाल्या होत्या.सकाळी शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी यांच्या पुतळय़ास शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी हारार्पण करून नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. दुपारी  शिवाजी पार्क परिसरातून शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास वंदन करून भव्य शोभायात्रा प्रारंभ झाली. परिसरात शिवशाहीचे वातावरण तयार करण्यात आले होते. आकर्षक रथात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे देखावे साकार करण्यात आले होते. रथ, अश्‍व, छत्र, चामर, ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी आ. गोपीकिसन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, समितीचे अध्यक्ष कृष्णा अंधारे, डॉ. अभय पाटील, अविनाश नाकट, अशोक पटोकार, अविनाश देशमुख, पवन महल्ले, जगदीश मुरूमकर, संदीप पाटील, संग्राम गावंडे, प्रकाश तायडे, मनोज तायडे, प्रदीप वखारिया, नगरसेवक मंगेश काळे, पंकज साबळे, कपिल रावदेव, नीलेश वानखडे, योगेश थोरात, विलास शेळके, आशिष पवित्रकार, प्रदीप वाघ, विनायकराव पवार, जिजाऊ ब्रिग्रेडच्या इंदुताई देशमुख, जयश्री  भुईभार, पूनम पारसकर,    डॉ. सीमा तायडे, भालतिलक आदींची उपस्थिती होती. शिवाजी पार्क, अकोट स्टॅन्ड, दामले चौक, अग्रसेन चौक, धिंग्रा चौक येथून वाजतगाजत येऊन या शोभायात्रेचा डॉ. आंबेडकर खुले नाट्यगृह येथे समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत बबलू बच्चेर, आकाश कवडे, आनंद सुकळीकर, चेतन ढोरे, वैभव माहोरे, हर्षल देशमुख, अभिजित मोरे, संजय सूर्यवंशी, मुकेश माळी, रामेश्‍वर पवळ, सागर तिवारी, नितीन सपकाळ, मुन्ना यादव, डॉ. संदीप चव्हाण, रहेमान बाबू, राहुल लोहिया, देवीलाल तायडे, दिनेश लोहोकार, विनोद राऊत, हारून शहा, अँड. ओम खंडारे, शरद टाले, नाझीम लीडर, राजीव इटोले, आनंद वानखडे, गणेश कळसकर, इस्माइल ठेकेदार, सुनील रत्नपारखी, महेंद्र सुतार, प्रकाश सोनोने, नंदरत्न खंडारे समवेत महिला -पुरुष व युवाशक्ती सहभागी झाली होती.

शिवनेरी, रायगड किल्ले ठरले आकर्षणाचे केंद्रया मिरवणुकीत जनअभियान संघटनेचे शिवनेरी किल्ला व रायगड किल्ल्याचे देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. शिवनेरी किल्ल्याच्या देखाव्यात माँ जिजाऊंच्या पेहरावात मराठी चित्रपट अभिनेत्री त्रिशा पाटील सहभागी झाली होती. शिवसेना नगरातील जय भवानी गोंधळी मंडळाची वाघ्या मुरळीची साथ संगत शिवकालीन प्रसंगाची साक्ष देणारी ठरली. या शोभायात्रेत युवक-युवतींचे संच, बालक-बालिकांनी बाल शिवाजींचा व जिजाऊंचा पेहराव करून सहभाग घेतला. जिल्हा कराटे संघाच्या बच्चे कंपनीची प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज