शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र बाळगण्याच्या परवान्याची उठाठेव का?

By admin | Updated: August 13, 2016 01:37 IST

अकोला जिल्हा परिषदेत वाढत्या मारहाणीच्या घटना; अधिका-यांच्या मागणीवर लोकप्रतिनिधींचा सवाल.

अकोला, दि. १२ : जिल्हा परिषदेत वारंवार मारहाणीच्या घटना होत असल्याने अधिकारी -कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने, स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्याची मागणी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली; मात्र सर्वसामान्यांची कामे तातडीने झाल्यास आणि समन्वयाचे वातावरण असल्यास मारहाणीच्या घटना घडणार नाहीत. शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविल्याने, समस्या सुटणार नाही आणि कामे होणार नाहीत, त्यामुळे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळण्याबाबत मागणीची उठाठेव कशासाठी, असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी ह्यलोकमतह्णशी बोलताना उपस्थित केला आहे.अकोला जिल्हा परिषदेत ९ ऑगस्ट रोजी पंचायत विभागातील ग्राम विकास अधिकारी मनोज बोपटे यांना भारती क्रीडा व शिक्षण मंडळाच्या सचिव भारती निम यांनी मारहाण केली. ग्रामविकास अधिकारी बोपटे यांना मारहाण करण्यात आल्यानंतर त्यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेऊन, निवेदन दिले. जिल्हा परिषदेत वारंवार मारहाणीच्या घटना घडत असल्याने, अधिकारी व कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकार्‍यांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा, अशी मागणीही केली. अधिकार्‍यांच्या मागणीनुसार शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्याबाबत विचार करू, असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात आले. परंतु, शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्याची मागणी कशासाठी, असा सवाल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी ह्यलोकमतह्णशी बोलताना उपस्थित केला.