शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न वाढीसाठी अकोला महापालिकेने काय केले?

By admin | Updated: June 4, 2016 02:24 IST

नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी उपटले मनपाचे कान.

आशिष गावंडे /अकोलाकर्मचार्‍यांचे थकीत वेतन अदा करण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपाकडे जमा असलेल्या 'एस्क्रो' खात्यातील ५ कोटी ७0 लक्षच्या मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यासंदर्भात शुक्रवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आजपर्यंत पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी काय केले ते आधी सांगा, अशी विचारणा करीत प्रशासनाचे कान उपटल्यामुळे ह्यएस्क्रोह्णच्या निधीला घरघर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्यामुळे कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाची समस्या पाचवीला पुजली आहे. १९९८ पासून अकोलेकरांच्या मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. तसेच मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न केल्यामुळे शहरात एकूण मालमत्ता किती, याचा थांगपत्ता नाही. २0११ मध्ये सहा महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १६ कोटी रुपये कर्ज स्वरूपात मनपाला दिले होते. त्याबदल्यात मनपाने उत्पन्नात वाढ करून प्रत्येक महिन्याला दहा लक्ष रुपये ह्यएस्क्रोह्ण खात्यात जमा केल्यानंतर संपूर्ण रक्कम शासनाकडे सुपूर्द करण्याची अट होती. मागील पाच वर्षांमध्ये ह्यएस्क्रोह्ण खात्यात व्याजापोटी ५ कोटी ७0 लक्ष जमा झाले. कर्मचार्‍यांनी संप पुकारल्यामुळे ही रक्कम वेतनासाठी मिळावी या उद्देशातून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी निधी घेण्यापूर्वी मागील पाच वर्षांत उत्पन्नवाढीसाठी काय निर्णय घेतले ते आधी सांगा,अशी स्पष्ट विचारणा प्रशासनाला केली. सद्यस्थितीत कर्मचार्‍यांची संख्या, मनपाचे एकूण उत्पन्न किती व मालमत्ता करात वाढ न करणे तसेच पुनर्मूल्यांकन न करण्याची कारणे सादर करण्याचा आदेश दिला आहे.