शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:40 IST

पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते.

अकोला: खरीप हंगामातील नियोजन करण्याचे काम सुरू असून,पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच शेतकऱ्यांकडील भाजीपाला, फळे विक्रीसाठी मार्गदर्शनावर भर देण्यात आला आहे.अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या पाच जिल्ह्यात सरासरी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.येत्या ३१ मे पर्यंत अमरावती विभागातील नियोजनाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा खते, बियाणे, कीटकनाशके ,औषधांचा पुरवठा करण्यासाठी घाऊक विक्रेते व वितरकाकडून बियाणे खतांचे ग्रेड इत्यादी माहिती घेऊन सहसंचालक कार्यालयाला पाठवावी त्यासाठीच्या सूचना सर्व कृषी सहाय्यक ते अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत, तसेच प्रत्येक दिवसाचा अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवण्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तालुका तसेच मंडळ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कच्चे काम सुरू आहे किंवा नाही, त्याचा अहवाल शेतकºयांना शेती कामासाठी लागणाºया मजुरांना त्यांच्या मागणीप्रमाणे कामाच्या कालावधीसाठी ओळखपत्र देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. कृषी सहायकांना क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी त्यांना निर्धारित केलेल्या मुख्यालयी जातात किंवा नाही, याबाबत सरपंचाकडून खातरजमा करून घ्यावी, तसेच खरीप हंगामातील नियोजन करून अंमलबजावणीला सुरुवात करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.विभागात ३२ लाख हेक्टरवर खरीप हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात येत आहे. शेतकºयांकडील फळे भाजीपाला विकण्यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.- सुभाष नागरे,विभागीय सह संचालक,कृषी, अमरावती.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती