शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

आम्ही नाही सुधरणार... दुसऱ्या दिवशीही ८१ मनपा कर्मचारी ‘लेट लतिफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 11:22 IST

Akola Municipal Corporation दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या झाडाझडतीमध्ये ८१ कर्मचारी ‘लेट लतिफ’ आढळले.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही आयुक्तांनी घेतली झाडाझडती.या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे.

 

; ८१ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात

 

अकोला : महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी कामांबाबत बेफिकीर झाले होते. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी बुधवारी विभागनिहाय झाडाझडती घेत कर्मचाऱ्यांची पडताळणी केली असता, तब्बल १४७ कर्मचारी ‘लेट लतिफ’ आढळले. या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे. एवढी माेठी कारवाई हाेऊनही अनेक कर्मचाऱ्यांची, ‘आम्ही सुधरणार नाही’, ही वृत्ती कायम असल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले. दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेल्या झाडाझडतीमध्ये ८१ कर्मचारी ‘लेट लतिफ’ आढळले. त्यांचेही वेतन कापले जाणार आहे.

आयुक्त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये मनपा कार्यालयांच्या हजेरी रजिस्‍टरांची तपासणी केली असता, त्‍यामध्‍ये एकूण ८१ कर्मचारी गैरहजर असलेले आढळून आले. यामध्ये सामान्‍य प्रशासन विभागातील ४, लेखा विभागातील ६, माहिती अधिकार कक्ष १, जलप्रदाय विभागाचे ८, आवक-जावक विभागाचा १, विद्युत विभागातील २३, शिक्षण ५, आरोग्‍य (स्‍वच्‍छता) विभागातील ५, संगणक विभागातील १, जन्‍म-मृत्‍यू विभागातील २, नगरसचिव विभागातील ६, नगररचना विभागातील ११, टेलिफोन विभागाचे २, बांधकाम विभागाचे ६, असे एकूण ८१ कर्मचारी आहेत. या सर्वांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्‍यात आले आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला