शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला पाणी पाहिजे; गांधीग्रामच्या महिलांचा आक्रोश!

By संतोष येलकर | Updated: April 24, 2023 18:21 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो.

अकोला : खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गेल्या महिनाभरापासून गावाला पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे ‘आम्हाला पाणी पाहीजे ’ असा आक्रोश करीत, गांधीग्राम येथील महिलांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीइओ) कार्यालयात हंडा मोर्चा काढला. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र पाणीपुरवठा योजनेचे ट्रान्सफार्मर जळाल्याने आणि जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात लिकेजेस असल्याने, गेल्या एक महिन्यापासून ( २५ मार्च) गावाला अद्याप पाणीपुरवठा करण्यात आला नाही. 

महिनाभरापासून नळ योजनेचे पाणी मिळाले नसल्याने, ग्रामस्थांना पूर्णा नदीतील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तसेच जनावरांनाही पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे गावाला तातडीने पाणीपुरवठा सुरु करुन, किमान आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा आणि पूर्णा नदीचे पाणी दूषित होवू नये, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी करीत २४ एप्रिल रोजी गांधीग्राम येथील महिलांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. डोक्यावर रिकामे हंडा घेवून आलेल्या महिलांनी ‘आम्हाला पाणी पाहीज’ अशा घोषणा देत गावात तातडीने पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली. या मोर्चात गांधीग्राम येथील सरपंच सुषमा ठाकरे यांच्यासह कुसुम पाटील, कल्पना निचळे, सुलोचना गावंडे, शोभा अढाऊ, सुवर्णा फुरसुले, सुमन इंगळे, अनिता हिंगणकर, सुवर्णा गावंडे, छाया मोहिते, दिपाली अढाऊ, पुष्पा अढाऊ, लता धुरेराव, मालू सदांशिव, प्रतिभा इंगळे, शरद ठाकरे, नरेंद्र सदांशिव, सदानंद ढोकणे, महादेव गवइ, गजानन अढाऊ आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

 मंगळवारी मिळणार गावाला पाणी; ‘सीइओं’चे आश्वासनगांधीग्राम येथील सरपंच सुषमा ठाकरे यांच्या नेतृत्वात महिलांच्या शिष्टमंडळाने गावातील पाणी प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याशी चर्चा केली. महिनाभरापासून बंद असलेला गावातील पाणीपुरवठा तातडीने सुरु करुन, आठवड्यातून किमान आठ दिवसाआड पाणी देण्याची मागणी केली. त्यानुषंगाने मंगळवार,२५ एप्रिल रोजी गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पंधरा दिवसाआड गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी महिलांच्या शिष्टमंडळास दिले. 

टॅग्स :Akolaअकोला