शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘जलमुक्त होळी’साठी आम्ही बांधील!

By admin | Updated: March 24, 2016 02:09 IST

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिकासह महावितरण व बँक कर्मचा-यांनी घेतली शपथ.

अकोला: जलमुक्त होळी साजरी करून पाण्याची नासाडी थांबवावी, असे लोकमतने केलेल्या आवाहनाला शहरातून सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, अधिपरिचारिका, परिचारिकांनी जलमुक्त होळी साजरी करून कोरडी होळी खेळण्याची शपथ घेतली. लोकमतच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी बुधवारी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, अधिपरिचारिका, महाविद्यालयातील विभागप्रमुखांची बैठक बोलावून त्यांना जलमुक्त होळी खेळण्याचे आवाहन केले आणि सध्या मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे दुष्काळाच्या झळांसोबतच पाणीटंचाईची भीषणता अनुभवत आहे. त्यामुळे यंदाची होळी पाण्याविना साजरी करून आणि पाण्याची बचत करावी, असे आवाहन डॉ. कार्यकर्ते यांनी केले. यावेळी डॉ. कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत डवंगे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, अधिपरिचारिका ग्रेसी मरियम, महेश महाकालीवार, डॉ. प्रमोद ठाकरे, डॉ. कल्पना काळे यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, विभाग प्रमुख आणि सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका, परिचारक, सफाई कामगारांना जलमुक्त होळी साजरी करण्याची शपथ दिली. महावितरणच्या अधिकारी, कर्मचा-यांनीही घेतली शपथमहावितरण कंपनीमधील कार्यकारी अभियंता किशोर मेश्राम, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) महेश दुशेलवार, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, गुरमितसिंह गोसल, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड यांच्यासह महावितरण कंपनीमधील अधिकारी, कर्मचार्‍यांनी पाण्याची नासाडी न करता कोरडी होळी साजरी करण्याची शपथ घेतली.