शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या ‘विजया’चा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 12, 2016 02:38 IST

मतदानापूर्वीच काँग्रेस-भारिपमध्ये बिनसले; स्थायीच्या सभापती पदासाठी भाजप, काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज सादर.

आशीष गावंडे / अकोलास्थायी समितीच्या सभापती पदासाठी दंड थोपटणार्‍या काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाची हवा चक्क मतदानापूर्वीच गूल झाली. सभापती पदासाठी शुक्रवारी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांनी तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने काँग्रेसचे अब्दुल जब्बार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. या निवडणुकीत ऐन वेळेवर भारिप-बमसंने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या ह्यविजयाह्णचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र समोर आले. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया १२ मार्च रोजी (शनिवार) मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडेल. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या वतीने शुक्रवारी विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पूर्वसंध्येला सत्तापक्षाच्या उमेदवाराला कडवे आव्हान देणार असल्याचे सांगत विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाने एकत्र येऊन दंड थोपटले होते. स्थायी समितीच्या सोळा सदस्यीय समितीमध्ये सत्ताधारी भाजप-सेनेच्या बाजूने आठ सदस्य तसेच विरोधी पक्ष काँग्रेस आघाडीच्या बाजूनेसुद्धा आठ सदस्य असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होईल, ही अपेक्षा होती. दोन्ही पक्षाकडे समान संख्याबळ असल्यामुळे काँग्रेस व भारिपने सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्या दालनात ११ मार्च रोजी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या गटनेत्यांची बैठकसुद्धा पार पडली. या बैठकीत आठ सदस्यांच्या बळावर काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर करण्यावर निर्णय झाला होता. तर विजयासाठी भारिपने एक सदस्य शिल्लक मिळवल्यास भारिपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. राजकीय सारिपाटावरील समीकरणांची चक्रे वेगाने फिरताच भारिप-बमसंने उमेदवारी अर्ज सादर करणे तर सोडाच चक्क निवडणुकीत भाग न घेता तटस्थ राहणार असल्याची भूमिका गटनेता गजानन गवई यांनी शुक्रवारी स्पष्ट केल्याने या निवडणुकीत काँग्रेस-राकाँ एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे.