शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘गोंधळ’ संपण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: October 14, 2014 01:26 IST

पुरातन कला जपण्यासाठी नवी पिढी अनुत्सुक; गोंधळी समाजाच्या पुनरुज्जीवनाची गरज.

राम देशपांडे /अकोला

        मंगल कार्याप्रसंगी विविध देवी-देवतांचा गोंधळ घालण्याची परंपरा संपूर्ण राज्यात विखुरलेल्या गोंधळी समाजाने जपली आहे. काळाच्या ओघात ही प्रथा सुरू ठेवण्याविषयी नवीन पिढी फारशी उत्सुक नाही. परिणामी, ही कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणार्‍या या समाजातील ज्येष्ठांना पोटापाण्यासाठी इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. हीच परिस्थिती राहिली तर, भविष्यात ही कला लोप पावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. शूभकार्याप्रसंगी देवीची स्तुती व पूजा करून गोंधळ घालण्याची प्रथा जुन्या काळी उदयास आली. पुराणादी लेखांमध्येही या कलेचा उल्लेख आढळतो. गनिमी काव्याचा एक भाग म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी गोंधळी समाजाने विकसित केलेल्या ह्यकरपल्लवीह्ण या सांकेतिक भाषेचा वापर केला होता. असुरी शक्तींवर विजय मिळविण्यासाठी गोंधळ घालून दैवी शक्तीला जागृत करणारे गोंधळीबुवा सर्वज्ञात आहेत. संबळ, तुणतुणं, टाळ, डफ अशी सर्व वाद्ये घेऊन तीन-चार गोंधळींचा समूह गोंधळ घालण्यासाठी घरोघरी जातात. खंडोबा, जोतिबा, काळू आई, रेणुका अशा विविध देवी-देवतांचा जागर गोंधळींद्वारे घातला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा गोंधळी समाजाने जपली असली तरी, सध्याच्या घडीला गोंधळी समाज अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. गोंधळाच्या माध्यमातून एकेकाळी संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या या समाजातील ज्येष्ठांना सद्यस्थितीत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून, नाइलाजाने इतर लहान- मोठय़ा व्यवसायांचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने गोंधळी समाजाला भटक्या विमुक्त जमातीमध्ये समाविष्ट केले असले तरी, शासनाच्या कित्येक योजना या समाजापर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत. तद्वतच, या कलेतून फारसे उत्पन्नही मिळत नसल्याने, या समाजाची नवीन पिढी वडिलोपार्जित परंपरा पुढे चालवावयास तयार नाहीत. शासनाने ज्येष्ठ कलाकारांसाठी सुरू केलेल्या अनुदान योजनेपासून या समाजातील हजारो ज्येष्ठ नागरिक अद्याप वंचित आहेत. केवळ आश्‍वासनांचे तुणतुणे वाजविणार्‍या अधिकार्‍यांना वारंवार अर्ज, निवेदने देऊन झाली; मात्र काहीही उपयोग झाला नाही. या समाजाला मदतीच्या हाताची गरज आहे. केवळ नोकरी आणि व्यवसायामागे धावणार्‍या नवीन पिढीमुळे भविष्यात ह्यगोंधळह्ण कला लोप पावण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत गोंधळी समाजाचे अध्यक्ष राजू पेंढारी यांनी व्यक्त केले.