शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅक्स’ आवरणाचा सफरचंद सुरक्षित; ‘ वॉशिंग्टन अ‍ॅपल कमिशन’चा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 14:41 IST

अकोला : सफरचंदावरील व्हॅक्सचे आवरण आरोग्यासाठी धोकादायक सिद्ध होत असताना, आमचे सफरचंद व्हॅक्स आवरण सुरक्षित असल्याचा दावा वॉशिंग्टन अ‍ॅपल कमिशनने केला आहे.

ठळक मुद्दे सफरचंद अधिक काळ चांगले राहावे आणि ग्राहक आकर्षणासाठी सफरचंदावर व्हॅक्सचे आवरण लावले जाते. व्हॅक्स आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने कारवाया झाल्यात.वॉशिंग्टनच्या सफरचंदांची मागणी कमी झाल्यापासून कंपनीने भारतातील बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांत जनजागृती सुरू केली आहे.

- संजय खांडेकरअकोला : सफरचंदावरील व्हॅक्सचे आवरण आरोग्यासाठी धोकादायक सिद्ध होत असताना, आमचे सफरचंद व्हॅक्स आवरण सुरक्षित असल्याचा दावा वॉशिंग्टन अ‍ॅपल कमिशनने केला आहे. वॉशिंग्टन अ‍ॅपल कमिशनचे दिल्ली येथील प्रतिनिधी राज्यातील बाजारपेठा गाठून भारत सरकारच्या राजपत्राच्या प्रती आणि भेटवस्तू वाटून वॉशिंग्टनचे सफरचंद आरोग्यासाठी अपायकारक नसल्याचे दाखले देत पटवून देत आहेत. अशीच एक चमू पंधरा दिवसाआधी दिल्लीहून अकोल्यात येऊन गेली.दररोज एक सफरचंद खा, अन सुदृढ राहा, असा डॉक्टरांचा सल्ला असतो. त्यामुळे आजारी व्यक्ती सोबतच सुदृढ व्यक्तींही नियमित सफरचंद खातात. त्यामुळे बारामाही सफरचंदाला मोठी मागणी असते. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात सफरचंदचे उत्पादन होते. सोबतच विदेशातूनही मोठ्या प्रमाणात सफरचंद भारतात येतात. सफरचंद अधिक काळ चांगले राहावे आणि ग्राहक आकर्षणासाठी सफरचंदावर व्हॅक्सचे आवरण लावले जाते. त्यासाठी अखाद्य तेल, पेट्रोलियम आणि मोमचा सर्रास वापर होतो. सफरचंदावरून नख कोरल्यास किंवा पृष्ठभागावार चाकू कोरल्यास व्हॅक्स आढळून येते. व्हॅक्स आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने कारवाया झाल्यात. त्यामुळे नागरिकांनीदेखील व्हॅक्स लावलेल्या सफरचंदाकडे पाठ फिरविली. वॉशिंग्टनच्या सफरचंदांची मागणी कमी झाल्यापासून कंपनीने भारतातील बाजारपेठांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांत जनजागृती सुरू केली आहे. कुटुंबकल्याण आणि आरोग्य मंत्रालयाच्या राजपत्राच्या प्रमाण प्रतीचे पत्रक दुकानाबाहेर लावण्याचा आग्रह हे प्रतिनिधी करीत आहेत. भारतातील आणि यूएसच्या अन्न -औषधीचे दाखलेही दिले जात आहेत. व्यापाºयांना प्रोत्सहनासाठी टी शर्ट, कॅप आणि विक्रीवर विविध योजना देत आहेत. असे आहे ‘वॉशिंग्टन’चे नैसर्गिक ‘व्हॅक्स’वॉशिंग्टनच्या सफरचंदाला लावून येणारे व्हॅक्स हे नैसर्गिक निर्मितीचे असून, त्याला भारत सरकारने रीतसर मान्यता दिलेली आहे. सफरचंदाला लावणारे व्हॅक्स हे मधमाशीपासून तयार होणाऱ्या मधासारखे आहे. ते आरोग्यासाठी अपायकारक नाही, असा दावा वॉशिंग्टन अ‍ॅपल कमिशने व्यापाऱ्यांना दिलेल्या पत्रकातून केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार