शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या पायथ्याशी बहरली कलिंगड शेती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 15:01 IST

अकोट : कॉटन बेल्ट, आॅरेंज बेल्टनंतर आता अकोट तालुक्यातील सातपुड्याचा पायथा कलिंगड लागवडीसाठी ओळखल्या जाऊ लागला आहे.

अकोट : कॉटन बेल्ट, आॅरेंज बेल्टनंतर आता अकोट तालुक्यातील सातपुड्याचा पायथा कलिंगड लागवडीसाठी ओळखल्या जाऊ लागला आहे. या भागात कलिंगडाची केलेली लागवड व होणारे उत्पन्न पाहता दिवसेंदिवस या फळबाग व्यवसायाकडे कल वाढू लागला असल्याचे चित्र दिसत आहे.अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते. भावसुद्धा विदर्भात सर्वात जास्त मिळतो. त्यापाठोपाठ येथील संत्र्याला चांगली मागणी असल्याने कॉटन बेल्ट आणि आॅरेंज बेल्ट असा पट्टा या भागात आहे; परंतु या दोन्ही पिकांकडे उत्पादकांचा ओढा कमी होऊ लागला असून, कलिंगडाच्या लागवडीकडे मात्र कल वाढला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी बोर्डी, आंबोडा परिसरात पवन रूपाजी पवार यांनी कलिंगडाचे चांगले उत्पादन घेतले आहे. शिवाय, बोर्डी येथील भालतिलक व इतर शेतकऱ्यांनीही कलिंगडची लागवड केली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेली जमीन रेताळ, मध्य काळी व गाळाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी आहे. त्यामुळे पवन पवार यांनी जानेवारी महिन्यात जमीन नांगरून कलिंगड लागवडीसाठी चार मीटर अंतरावर पाटसऱ्या काढल्या. दोन मीटर रुंद उंच गादी वाफ्यांमध्ये कलिंगड बियाण्यांची पेरणी केली. सिंचनाचे योग्य व्यवस्थापनही केले. वेलींची गुंतागुंत होऊ नये, याकरिता विशिष्ट अंतर ठेवले. वेळोवेळी सेंद्रिय खत व बुरशीनाशक प्रक्रिया केली. याकरिता त्यांना प्रतिएकर ६० ते ७० हजार रुपये खर्च आला. सध्या हे कलिंगड परिपक्व झाले असून, बाजारपेठेत विकण्याकरिता काढण्यात येत आहेत. केवळ तीन महिन्यांमध्ये प्रतिएकर २० ते २५ टन उत्पादन होण्याची शक्यता पवन पवार यांनी व्यक्त केली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी तयार होत असलेल्या कलिंगडामध्ये कमी बिया व गोडवा असल्याने बाजारपेठेतसुद्धा मागणी होऊ लागली आहे. पूर्वी बाहेरगावाहून बाजारपेठेत कलिंगड विक्रीकरिता यायचे; मात्र आता या परिसरातील शेतकरीच फळ पिकांकडे वळल्याचे सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कलिंगडाच्या शेतीवरून दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट