शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरने पाणी देऊन फळबागा जगविण्याचा आटापिटा!

By admin | Updated: March 8, 2016 02:19 IST

विदर्भात काही भागांमध्ये गारपीट, काही भागात तापमानात वाढ.

अकोला: विदर्भात गतवर्षी पूरक पाऊस न झाल्याने त्याचे तीव्र परिणाम फळपिकांवर होत असून, अनेक ठिकाणी फळबागा वाचविण्यासाठी कृषी संस्थांसह शेतकर्‍यांना आटापिटा करावा लागत आहे. गत आठवड्यापासून विदर्भात काही भागात गारपीट होत असली तरी अनेक भागांमध्ये तापमान वाढल्याने शेतकर्‍यांना पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने मुख्यत्वे पश्‍चिम विदर्भातील धरणांमध्ये अपेक्षित जलसंचय झाला नाही. परिणामी पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी या भागातील प्रशासनाने ५0 टक्क्यांच्या आत जलसाठा असलेल्या धरणांमधून सिंचनासाठी पाणी सोडण्यास प्रतिंबध घातला आहे. पश्‍चिम विदर्भातील जवळपास सर्वच धरणांमधील जलपातळी सरासरी १५ ते २0 टक्क्य़ांपर्यंतच आहे. परिणामी अनेक ठिकाणी विहिरी, कूपनलिकांमध्ये पाणी नसल्याने शेतकर्‍यांपुढे फळबागा जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संत्र्याचे सर्वाधिक १ लाख ५0 हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे; परंतु पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे वातावरणात आद्र्रता नाही तसेच पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. राज्यात केळीचे क्षेत्र ८२ हजार हेक्टर असून, द्राक्षे ९0 हजार, पेरू ३९ हजार, आंबा ४८२ हजार, पपई १0 हजार, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार, चिकू ७३ हजार व इतर फळपिके ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहेत. रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत या राज्यात सर्वाधिक फळबाग लागवड झाली आहे. म्हणूनच फळपिकांबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे; परंतु ५0 फूट खोलीवर लागणारे पाणी आता ३00 ते ३५0 फूट खोल जाऊनही लागत नसल्याचे या भागातील चित्र आहे.यावर्षीच्या उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. संत्र्याचे पीक गारपिटीने एकीकडे उद्ध्वस्त होत असताना, दुसरीकडे पाणी नसल्याने झाडाला लागलेली संत्री पिवळी पडत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने टॅँकरने पाणी देऊन झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.