शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जुने शहरातील आंबेडकर मैदानालगतच उभारणार जलकुंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:43 IST

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आंबेडकर मैदानालगतच्या जागेवरच जलकुंभ उभारणार असल्याचे स्पष्ट केले.

अकोला: केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत जुने शहरातील आंबेडकर मैदानाच्या बाजूला उभारल्या जाणाºया जलकुंभाला स्थानिक रहिवासी व अतिक्रमकांनी आडकाठी निर्माण करीत मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी आंबेडकर मैदानालगतच्या जागेवरच जलकुंभ उभारणार असल्याचे स्पष्ट केले असून, पोलीस बंदोबस्तात जलकुंभाचे कामकाज सुरू करण्याचा आदेश गुरुवारी जलप्रदाय विभागाला दिला.केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहराच्या पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामासाठी शासनाने ११० कोटी मंजूर केले. त्यापैकी ८७ कोटींची निविदा प्रकाशित करण्यात आली होती. जलवाहिनीचे जाळे टाकण्यासोबतच शहराच्या विविध भागात आठ ठिकाणी नवीन जलकुंभाची उभारणी केली जात आहे. याचा कंत्राट ‘एपी अ‍ॅण्ड जीपी’ कंपनीला देण्यात आला असून, आठपैकी सहा जलकुंभांच्या उभारणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यादरम्यान, जुने शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने आंबेडकर मैदानलगतची जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याच्या उद्देशातून मनपाच्या जलप्रदाय विभागासह अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी जागेवर पोहोचले असता, त्यांना स्थानिक रहिवाशांनी धक्काबुक्की, धमक्या व शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. यासंदर्भात गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय विभागाचा आढावा घेतला असता, स्थानिक रहिवाशांच्या हेकेखोर भूमिकेला अजिबात थारा न देण्याचे निर्देश त्यांनी जारी केले. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाºया नागरिकांविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या उद्देशातून पोलीस बंदोबस्तात जलकुंभाचे कामकाज सुरू करण्याचा आदेश आयुक्त कापडणीस यांनी दिला आहे....तर पाणी पुरवठ्याची समस्या दूर होईल!आंबेडकर मैदानालगत उभारला जाणारा जलकुंभ १८ लाख लीटर क्षमतेचा आहे. या जलकुंभाच्या माध्यमातून आंबेडकर नगरचा काही भाग, खैर मोहम्मद प्लॉटसह जुने शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात पाणी पुरवठा होणार असून, यामुळे अनियमित पाणी पुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.नगरसेवकांची चुप्पी का?एरव्ही प्रभागातील विविध समस्यांवर सभागृहात घसे कोरडे करून प्रसिद्धी लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या या प्रभागातील नगरसेवकांनी जलकुंभाच्या मुद्यावर चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे. मतांच्या समीकरणापायी जलकुंभासारख्या महत्त्वाच्या विषयावर नगरसेवकांनी तोंडावर बोट ठेवणे पसंत केल्यामुळे प्रभागातील सुज्ञ नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.

जुने शहरातील आंबेडकर मैदानाच्या जागेवर अतिक्रमकांनी कब्जा केला आहे. या ठिकाणी उभारल्या जाणाºया जलकुंभामुळे जुने शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. जलकुंभाच्या उभारणीला अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, यात दुमत नाही.-संजय कापडणीस,आयुक्त, मनपा.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका