शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नदीतील पाणी शेततळ्यात घेऊन केली मत्स्यशेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 14:00 IST

तेल्हारा: तालुक्यातील नेर येथील एका अल्पधारक शेतकऱ्याने आपल्या शेतात शेततळे खोदले व त्यामध्ये मत्स्यशेती करीत आहेत

- सत्यशील सावरकर

तेल्हारा: तालुक्यातील नेर येथील एका अल्पधारक शेतकऱ्याने आपल्या शेतात शेततळे खोदले व त्यामध्ये मत्स्यशेती करीत आहेत. त्याच बरोबर परिसरातील तीन गावातील नागरिक व गुराढोरांच्या पाण्याची समस्या दूर केली.तालुक्यातील नेर येथील भगवंत शालीग्राम बावने या शेतकºयाने आपल्या शेतात तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतात शेततळे खोदून घेतले. शासनाचा निधी व आपल्या मिळकतीतून शेततळ्यात पाणी भरण्यासाठी चार हजार फुटावरून पाइपलाइन टाकून पूर्णा नदीतील डोहातून पाणी घेतले व शेततळे भरले. शेतातील जमीन चोपन असल्याने पाणी जिरू नये म्हणून टाकण्यात येत असलेली फिल्म टाकण्याची गरज नसल्याने तो खर्च कमी झाला. त्यात जवळचे पैसे टाकून व्यवसाय करण्याचे ठरविले. दरवर्षी होणारी नापिकी, खरिपात पिकाचे कीड व रोगाने उत्पादन घटले. खरिपाच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेततळ्यातील पाण्यावर रब्बीत बागायती पिके घेतल्यापेक्षा आपल्या वंशपरंपरागत मत्स्यशेतीचा पर्याय भगवंत बावने यांनी निवडला. शेततळ्यात पंधरा हजार मत्स्यबीज सोडले असून, ते विक्रीसाठी तयार होत आहेत. त्यापासून दोन लाखापर्यंत उत्पादन अपेक्षित आहे.शेततळ्यातील जोडव्यवसाय उत्पन्न देत राहील; परंतु सामाजिक भान ठेवून भगवंत बावने यांनी परिसरातील नेर, सांगवी, पिवंदळ या गावातील नागरिकांना तथा गुराढोरांच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा काही अंशी कमी केला. खारपाणपट्टा असल्याने दूर दूर पाणी दिसत नाही; परंतु नेर सांगवी, चोहोट्टा रस्त्यावरील तुडुंब भरलेले शेततळे रखरखत्या उन्हाळ्यात दिलासा देत आहेत.मासेमारी हा परंपरागत व्यवसाय आहे; परंतु दिवसेंदिवस नद्यांचे पाणी पावसाळ्यातसुद्धा दिसत नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय व मत्स्य व्यवसाय करणाºया पत संस्था डबघाईला आल्या आहेत. पूर्णा नदीखोºयात शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यशेती करण्यासाठी शासनाच्या शेततळे योजनेतून शेततळे करून शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.भगवंत बावने, शेतकरी. 

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराfishermanमच्छीमार