शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

३७३ मागास वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:59 IST

जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाचे अभियंता गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अंदाजपत्रक तयार करणार आहेत.

अकोला: सामाजिक न्याय विभागाकडून मागासवस्ती विकास योजनेसाठी देण्यात आलेला ४९ कोटी रुपये निधी प्राधान्याने पाणीपुरवठा योजना, संबंधित सोयी-सुविधेसाठीच खर्च करण्याचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्ह्यातील ३७३ वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याशी संबंधित सोयी-सुविधा निर्मितीसाठी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागाचे अभियंता गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन अंदाजपत्रक तयार करणार आहेत. पुढील शनिवारी कामांची अंतिम निवड केली जाणार आहे, असेही मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, समाजकल्याण अधिकारी वसतकार उपस्थित होते.सामाजिक न्याय विभागाकडून मागास वस्तीमध्ये विकास कामांसाठी दरवर्षी निधी दिला जातो. निधी खर्च करण्यासाठी आधी मागास वस्त्यांची स्थान निश्चिती करून त्यामध्ये कामांचा आराखडा मंजूर केला जातो. जिल्हा परिषदेत २०१८-२०२३ पर्यंतचा मागास वस्ती विकास आराखडा विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे. त्या आराखड्यानुसारच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १,८६७ मागास वस्त्यांमध्ये विकास कामे करता येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभेत प्रशासक आयुष प्रसाद यांनी गेल्या १० वर्षात एकदाही निधी न मिळालेल्या वस्त्यांची नावे निश्चित केली. त्यामध्ये ३७३ वस्त्या आहेत. त्या वस्त्यांमध्ये १ लाख ७५ हजार लोकसंख्येसाठी प्राधान्याने पाणीपुरवठ्याची कामे केली जातील. वस्त्यांमध्ये अभियंत्यांच्या प्रत्यक्ष भेटीतून तयार होणारे अंदाजपत्रक शनिवारी बैठकीत मंजूर होणार आहे.

डॉ. आंबेडकर पाणी सत्याग्रह योजनामागास वस्ती विकास योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या कामांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी सत्याग्रह योजना’ असे नाव दिले जाणार आहे. योजनेतून वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष पाणीपुरवठा करणे, आधीच पुरवठा होत असल्यास प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करणे, तेही असल्यास पाणी शुद्धीकरण यंत्र उभारण्याची कामे केली जाणार आहेत.

लोकप्रतिनिधींच्या मागण्यांचा पुढील वर्षी विचारविशेष म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावांमध्ये कोणती कामे प्राधान्याने करावयाची आहेत, याची माहिती लोकप्रतिनिधींकडून मागवली होती. त्यानुसार अनेकांनी पत्र देत कामे सुचवली. त्या सूचना चालू वर्षाच्या नियोजनात बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. पुढील वर्षाच्या नियोजनात त्यावर विचार केला जाईल, असेही आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

त्या वस्त्या राहणार वंचितसमाजकल्याण विभागाने २००३-०४ व २००४-०५ या वर्षात मागास वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यापैकी कोणत्याही गावात योजना सुरू नाहीत. त्यातून पाणीही मिळत नाही. तरीही त्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेवर आधीच खर्च झाल्याने आता निधी दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद