शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणा तानखेड येथून होणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:37 IST

मूर्तिजापूर : महान धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तिजापूर शहराला हिंगणा तानखेड व शिवण लघू धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतली मूर्तिजापूर शहराच्या पाणीपुरवठय़ावर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : महान धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तिजापूर शहराला हिंगणा तानखेड व शिवण लघू धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. निम्मा पावसाळा निघून गेला असला, तरी मूर्तिजापूर शहर व तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांनी तळ गाठला असून, मूर्तिजापूर ग्रामीण व शहरी भागात जल संकट निर्माण झाले आहे. महान धरणात पाणी नसल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. हिंगणा बंधारा येथून सध्या शहराकरिता पाणी येत आहे. परंतु, तेथेही जास्त पाणी साठा नसल्याने पाऊस न आल्यास भीषण पाणी समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.नैसर्गिक बिकट स्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन शक्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय  यांच्या कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत आमदार हरीश पिंपळे, आ. गोपीकिसन बाजोरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर, वीज वितरणचे मुख्य अभियंता अकोला दोडके, उंबरकर, मूर्तिजापूर नगराध्यक्ष  मोनाली  गावंडे व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान मूर्तिजापूर शहरासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाई निर्माण होत आहे. यावर शहरासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे.