आकोट (जि. अकोला): तालुक्यातील विटाळी सावरगाव येथे पाणीपुरवठा बंदच होता, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा कोठून झाला, मुदतबाह्य औषधींचे वितरण कोणी केले, याची चौकशी करून पाण्याची समस्या तातडीने निकाली काढावी, अशी मागणी राजकीय पक्ष व ग्रामस्थांनी रविवारी केली. कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या विटाळी सावरगाव येथे बुधवारी ६0 पेक्षा जास्त ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली होती. शनिवारी आमदार रणधीर सावरकर यांनी खासगी डॉक्टर-कर्मचार्यांच्या चमूसह गावात धाव घेतली होती. चमूतील डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. गुरुवारी आरोग्य विभागाने मुदतबाह्य औषधी देण्यात आल्याचा आरोप काही रुग्णांनी यावेळी केला होता.
पाणीपुरवठा होता बंद; मजीप्राचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 02:16 IST