शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजना, शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:56 IST

अकोला : प्रत्येक परिमंडळात २०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांद्वारे पाणी पुरवठा करणे, शासकीय इमारतींवर सोलर रूफ टॉप प्रकल्प उभारणीची तयारी वेगात असून, त्यासाठी राज्याच्या ऊर्जा विभागाने शुक्रवारी त्यासाठी आवश्यक माहिती सर्वच जिल्ह्यांतून घेतली आहे.

अकोला : प्रत्येक परिमंडळात २०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांद्वारे पाणी पुरवठा करणे, शासकीय इमारतींवर सोलर रूफ टॉप प्रकल्प उभारणीची तयारी वेगात असून, त्यासाठी राज्याच्या ऊर्जा विभागाने शुक्रवारी त्यासाठी आवश्यक माहिती सर्वच जिल्ह्यांतून घेतली आहे. सोबतच शहरांमध्ये नागरिकांना सौर वॉटर हिटर लावण्यासाठी अनुदानही दिले जाणार आहे.नव्या धोरणानुसार प्रत्येक परिमंडळ कार्यालयांतर्गत २०० मेगावॉट निर्मिती क्षमतेचे प्रकल्प उभारले जातील. त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी जागा द्यावयाची आहे.ग्रामीण भागात आधीच पारेषण विरहित सौर पंपाद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात लघुजल नळ पाणी पुरवठा योजनांसाठी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला होत आहे. त्यानंतर आता ५ अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेचे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे पंप पारेषणसह सौर ऊर्जेवर चालविले जाणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींकडून जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. त्याशिवाय, शासकीय इमारतींवर सोलर रूफ टॉप लावण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयांच्या इमारतींची यादीही मागविण्यात आली आहे.उपसा जलसिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी लाभार्थी संख्येसह माहिती गोळा केली जात आहे. सोबतच महापालिका क्षेत्रातील ग्राहकांना सौर वॉटर हिटर लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. १०० ते ३०० लीटर क्षमतेच्या हिटरसाठी ८० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाईल. त्यासाठी ग्राहकाला २० टक्के खर्च करावा लागणार आहे. जिल्ह्यातील पाच हजार लाभार्थींना त्याचा लाभ दिला जाणार आहे. ही सर्व माहिती ऊर्जा विभागाने गोळा केली आहे.

- विविध बाबींसाठी सौर ऊर्जा प्रकल्पपारेषण संलग्न अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून लघुजल विद्युत प्रकल्प, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, तर पारेषण विरहित अपारंपरिक ऊर्जा साधनांमध्ये इमारतीचे छत व जमिनींवरील पारेषण विरहित सौर विद्युत संच, लघुजल व नळ पाणी पुरवठ्यासाठी सौर पंप, सौर उष्ण जल संयंत्रे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, शासकीय इमारतींमध्ये पारेषण संलग्न रूफ टॉप आणि लघू सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती केली जाणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना