शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

६४ खेडी पाणीपुरवठा योजनेचे करणार पुनरुज्जीवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 10:57 IST

प्रस्तावाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे.

अकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली आहे.६४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी शिकस्त झाली असून, या जलवाहिनीवर ठिकठिकाणी लिकेजेस होत आहेत. तसेच पाणी उचल करण्याचे पंपदेखील वारंवार बंद पडत असल्याने या योजनेंतर्गत गावांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ठेवण्यात आला. त्यानुसार ६४ खेडी पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावाला या सभेत मंजुरी देण्यात आली. पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कामाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले. तसेच योजनेच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर ही पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जिल्हा परिषद हस्तांतरित करणार असल्याचेही सभेत ठरविण्यात आले. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा आढावा या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपाध्यक्ष सावित्री राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी सभापती पंजाबराव वडाळ, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनीषा बोर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समितीचे सदस्य मीरा पाचपोर, संजय बावणे, माया कावरे, अपू तिडके, संजय आढाऊ यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा व लघुसिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वित्त आयोगाचा निधी पाणीपुरवठ्यासाठी खर्च करा!पंधराव्या वित्त आयोगाचे अंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामावर खर्च करण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले.

बंधारे दुरुस्तीचा आराखडा करा!जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे, तलावांची दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश लघुसिंचन विभागाला यासाठी देण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटAkola ZPअकोला जिल्हा परिषदwater transportजलवाहतूक