शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा दूषित नाही; प्रयोगशाळेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:51 IST

अकोला: अकोलेकरांना होणारा पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा दूषित नसल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे.

अकोला: अकोलेकरांना होणारा पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा दूषित नसल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. मंगळवारी शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा झाला असता, तो पिवळ्या रंगाचा नसल्याची माहिती आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलप्रदाय विभागातील हालचाली वाढल्या आहेत.मागील काही दिवसांपासून शहरवासीयांना पिवळ्या रंगाचा गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र होते. पाण्याचा गढूळपणा लक्षात घेता सदर पाण्याच्या बाबतीत अकोलेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. धरणात मुबलक जलसाठा असूनही नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने वारंवार प्रकाशित केले. याप्रकरणी जलप्रदाय विभागाची भूमिका लक्षात घेता शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया, गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवकांनी सोमवारी मनपात धाव घेऊन यासंदर्भात आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. याप्रकरणाची गंभीरपणे दखल घेत आयुक्तांनी स्वत: महान येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत सादर केले होते. मुख्य अणुजीव शास्त्रज्ञांनी सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल दिल्याचा दावा जलप्रदाय विभागाने केला आहे. यादरम्यान, मंगळवारी शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा झाला असता, तो पिवळसर नसल्याचे समोर आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका