शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा धरणातील ४.५ टक्के जलसाठ्यातून होतोय ‘एमआयडीसी’ला पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:20 IST

अकोल्यातील उद्योगांसाठी कुंभारी तलाव आरक्षित आहे; पण जर महान धरणातील जलसाठा संपुष्टात आला, तर अकोलेकरांची परीक्षा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही.

अकोला : अकोलेकरांची तहान भागविणाऱ्या महानच्या काटेपूर्णा धरणातील जलसाठा साडेचार टक्क्यांवर शिल्लक राहिलेला असतानादेखील त्यातून औद्योगिक वसाहतींच्या उद्योगांना पाणी पुरवठा केला जात आहे. उद्योगांसाठी कुंभारीच्या तलावाचा जलसाठा असताना ते आरक्षित ठेवण्यात आले आहे. जर पावसाने दांडी मारल्यास अकोलेकरांची परीक्षा घेतली जाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.यंदा पाहिजे तसा मान्सून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा परिसरात आला नाही. त्यामुळे जुलै महिना लागला असतानाही वातावरणात गारवा नाही. पावसाळा असतानादेखील पाऊस नावाला नाही. आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस आहे की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे अकोलेकरांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे. अशी परिस्थिती असतानादेखील जिल्हा प्रशासनातर्फे पाणीटंचाईच्या उपाययोजनांची खबरदारी अद्याप सुरू झालेली नाही. अकोला महानगराची तहान भागविणाºया महानच्या काटेपूर्णा धरणात साडेचार टक्के जलसाठा आजच्या घडीला शिल्लक आहे. हा जलसाठा काही महिन्यांचा असला तरी, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईसाठीची पावले उचललेली नाहीत. साडेचार टक्के जलसाठ्यातून अकोला एमआयडीसीच्या चारशे उद्योगांना दैनंदिन पाणी पुरवठा केला जात आहे. वास्तविक पाहता, अकोल्यातील उद्योगांसाठी कुंभारी तलाव आरक्षित आहे; पण जर महान धरणातील जलसाठा संपुष्टात आला, तर अकोलेकरांची परीक्षा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जमिनीतील जल स्तरही कमी झालेला आहे. शहरातील अनेक नागरी वसाहतींमधील कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. अशा स्थितीत कुंभारीचा पर्यायी जलसाठा ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याने अनेकांनी आक्षेप घेतला आहे.-अकोला एमआयडीसीच्या उद्योगांना तूर्त महान धरणातील खांबोरा प्रकल्पातून पाणी पुरवठा होत आहे. कुंभारी तलावातील जलसाठा हा उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.-संजय जलतारे, उपकार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ