शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला एमआयडीसीला पुन्हा खांबोरा येथून पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:03 IST

अकोला : एमआयडीसी परिसराला होत असलेला दूषित पाणी पुरवठा अखेर बंद झाला असून, खांबोराच्या पाणी पुरवठा योजनेमधून शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.

अकोला : एमआयडीसी परिसराला होत असलेला दूषित पाणी पुरवठा अखेर बंद झाला असून, खांबोराच्या पाणी पुरवठा योजनेमधून शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.काही दिवसांपासून एमआयडीसीत दूषित पाणी पुरवठा होता, चारशे ते सातशे टीडीएसचे प्रमाण असलेले पाणी परिसरातील कामगार प्राशन करीत असून, त्यांच्या आरोग्यास धोका असल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांनी कुंभारी तलावाच्या पाण्याचे नमुने शासकीय यंत्रणेकडे तपासणीसाठी पाठविले. त्यातदेखील पाणी दूषित आढळले. त्यामुळे कुंभारीचा पाणी पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. दरम्यान, उन्हाळ्यापासून बंद करण्यात आलेला खांबोरा पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे मात्र पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या कुंभारी तलावाचे पाणी दूषित झाले तरी कसे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.दूषित पाण्याचा निचरा सोडणाऱ्यांचा शोधकुं भारी तलाव परिसरात जे उद्योग आहे, त्यांचा कारखान्याचा सांडवा कुंभारीच्या तलावात सोडला जातो. अशा उद्योगांचा शोध आता सुरू झाला आहे. काही मोजक्या कारखानदारांनी संपूर्ण तलावाचे पाणी दूषित केले आहे. त्या कारखान्याचा शोध घेणे सुरू आहे. यासाठी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे; मात्र इंडस्ट्रीजच्या पदाधिकाºयांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही. 

एमआयडीसीला दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर आम्ही चाचपणी केली. त्या वृत्तास दुजोरा मिळाल्यानंतर आम्ही तातडीने कुंभारीचा पाणी पुरवठा थांबविला आहे. आता खांबोरातून पाणी पुरवठा होत आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ