शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा धरणातील जलसाठा पुरणार १२० दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:17 IST

८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.

अकोला: काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात २६ दिवसात केवळ ५.३२ टक्के वाढ झाली आहे. २३ जुलै रोजी या धरणात ३.५ टक्के जलसाठा शिल्लक होता. आजमितीस ८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.काटेपूर्णा धरणाचे पाणलोट क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील काटा येथे आहे; परंतु काटानंतर छोटे-मोठे १२ प्रकल्प असून, या प्रकल्पातही अपेक्षित साठा झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी काटेपूर्णा धरणात पोहोचणे कठीण आहे. याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे. काटेपूर्णा धरणाच्या परिसरात जूनपासून आतापर्यंत २४७.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पडणाऱ्या पावसाच्या भरवशावर जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या कुशीत वसलेल्या वान धरणात ७५.८९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाच्या परिसरात आतापर्यंत ८७१.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, दोन ते तीन वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरण शून्य टक्के होते २३ दिवसात या धरणाच्या परिसरात ३७१.० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून, आजमितीस १४.०४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणाची अवस्थाही अशीच होती. या धरणाच्या परिसरात ६१९.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, आजमितीस २०.६७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाच्या परिसरात आतापर्यंत केवळ २६०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शून्य टक्के असलेल्या या धरणात आजमितीस ६.३४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजचा जलसाठाही शून्य टक्के होता. आजमितीस ७.३० टक्के पाणी उपलब्ध आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण