महान : रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळावे यासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून सिंचनासाठी यंदा १५ मार्च २०२१पर्यंतच पाणीपुरवठा केला जाईल, याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे उपविभाग बोरगाव मंजू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा काटेपूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी १५ नोव्हेंबर २०२० रोजी पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत काटेपूर्णा प्रकल्पातून दोन रोटेशनप्रमाणे पाणी सोडण्यात आले होते. त्यावरून यापुढे सिंचनासाठी पाणी पुढील तारखाचे वेळापत्रकानुसार सोडण्यात याबाबत शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाेरगाव मंजू पाटबंधारे उपविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
असा राहील पुरवठा
५ जाने. २०२१ ते १७ जाने. २०२१. एकूण १२ दिवस
२२ जाने. ते ४ फेब्रु. २०२१ १३ दिवस
९ फेब्रु. ते २४ फेब्रु. २०२१.. १५ दिवस
२ मार्च ते १५ मार्च २०२१ .. १३ दिवस