नेर (अकोला): वीज वितरण कंपनीच्या भांबेरी उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या नेर, पिवंदळ, हनवाडी, सांगवी हिवरे, नांदखेड येथील पाणीपुरवठा विजेच्या अनियमिततेमुळे प्रभावित झाला आहे. नेर, पिवंदळ, हनवाडी, सांगवी हिवरे, नांदखेड या गावांना पंचगव्हाण येथील कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा होतो; परंतु भांबेरी वीज केंद्राच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील गावांमध्ये भारनियमनाव्यतिरिक्त अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे या गावातील पाणीपुरवठा प्रभावित होतो. या परिसरातील लोकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थ हैरान झाले आहेत. ग्रामस्थांना उन्हाळ्याच्या दिवसांत उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. डासांचाही उपद्रव वाढला आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे.
विजेच्या लपंडावाने पाणीपुरवठा प्रभावित
By admin | Updated: May 19, 2014 19:57 IST