शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वऱ्हाडातील जलसाठा पाच टक्क्यांनी घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 2:50 PM

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत एका महिन्यात पाच टक्के घट झाली असून, आजमितीस ५८.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठ्यात गत एका महिन्यात पाच टक्के घट झाली असून, आजमितीस ५८.१९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात ५१.७५ टक्के जलसाठा होता. तो आजमितीस ४२.५७ टक्के तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा व मस दोन्ही धरणातील जलसाठा शून्य आहे.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये २५ सप्टेंबर रोजी ६३.४८ टक्के जलसाठा संचयित झाला होता. गत सव्वा महिन्यात या साठ्यात घट झाली असून, आजमितीस ५८.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा यावर्षी सुरुवातीपासूनच शून्य टक्के आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ९४.२६ टक्के जलसाठा संकलित झाला होता. हा साठा आता ८७. ६१ टक्के आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के साठा होता आता ९६.९८ असून, उमा १०० हून ९७ टक्के तर मोर्णा धरणात ५१.०६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वान धरणात ९५.२५ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मस धरणात शून्य साठा असून, कोराडी मध्यम धरणातील जलसाठा केवळ ५.३६ टक्के आहे. तोरणा १२.८०, उतावळी धरणातील पातळी ४०.४२ टक्के आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १६.०८ टक्के, पेनटाकळी धरणात १४.४७ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.७७ टक्के, पलढगमध्ये ३०.७६ टक्के, मन धरणात २३.७० टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ८८.६८ टक्के, एकबुर्जी ८१.१४ तर सोनल धरणात ९८.८८ टक्के जलसाठा आहे.अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात ४२.५७ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ९७.९९, अरुणावती ८४.०७ तर बेंबळा धरणातील जलसाठा ६२.०२ टक्क्यांवरू न ५२.७२ टक्के घटला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण