शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:48 IST

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी देण्यात आले.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी देण्यात आले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने स्थायी समितीच्या सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही. तथापि, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करुन, टंचाईग्रस्त गावांमध्ये ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश या सभेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात आले. मागील सभेच्या इतिवृत्ताला सभेत मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, कृषी सभापती माधुरी गावंडे, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, समितीचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, दामोदर जगताप, डॉ. हिंमत घाटोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसंत खिल्लारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.खांबोरा पाणीपुरवठा योजनेच्यापंपाची दुुरुस्ती करा!६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी उचल करण्याचे पंप नादुरुस्त असल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेच्या पंपाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही या सभेत देण्यात आले.कृषी-पशुसंवर्धन समितीच्या सभेत केवळ इतिवृत्त मंजूर!गत ८ एप्रिल रोजी तहकूब करण्यात आलेली जिल्हा परिषद कृषी समितीची सभा शुक्रवार,१२ एप्रिल रोजी घेण्यात आली; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने, कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता, केवळ मागील सभेचे इतिवृत्त यासभेत मंजूर करण्यात आले. कृषी सभापती माधुरी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ. हिंमत घाटोळ व संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या सभेतही केवळ मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य अहिल्या गावंडे, माया कावरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदWaterपाणी