शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई वाढली; पिकावर परिणाम!

By admin | Updated: March 28, 2016 01:22 IST

उन्हाळी पिके जगवण्यासाठी अतिदुर्गम भागात व्यवस्थापनावर भर.

अकोला: पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर विदर्भातील उन्हाळी पिकांचे व्यवस्थापन व काळजी घेण्यात येत असून, शेतकर्‍यांना यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने यावर्षी विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये उन्हाळी भुईमूग पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पांतर्गत विविध पिकांच्या उत्पादनवाढीवर भर देण्यात येत आहे. दुर्गम भागातील शेतकर्‍यांना शेतावर पीक प्रात्यक्षिक व व्यवस्थापनाची माहिती देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २0१५-१६ या वर्षी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतीपुढील आव्हाने बघता, शेतकर्‍यांसाठीच्या योजनांवर अधिक भर देण्यात आला असून, कृषी विद्यापीठामार्फत भुईमूग पिकाच्या अद्ययावत लागवड तंत्रज्ञानावर अधिक भर देण्यात येत आहे. या अनुषंगाने पातूर तालुक्याच्या दुर्गम डोंगरी भागातील सावरगाव, वसाली व पांगरताटी येथील लाभार्थींच्या शेतावर अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांना देण्यात आली. राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकर्‍यांना उन्हाळी भुईमूग पिकाचे अद्ययावत लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन होण्याच्या दृष्टीने बुधवारी सावरगाव येथे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. विकसित केलेल्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार हा दुर्गम डोंगरी भागातील सर्व शेतकर्‍यांपर्यंत होईल तसेच परिसरातील उन्हाळी भुईमूग घेणार्‍या शेतकर्‍यांनी विद्यापीठाने दिलेल्या पीक प्रात्यक्षिकास भेट देऊन उन्हाळी भुईमूग लागवडीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घेऊन या पिकाच्या उत्पादनवाढीचे सुधारित तंत्रज्ञान अवगत करावे, हा उद्देश आहे. विदर्भातील शेतकर्‍यांनी तंतोतंत शेती करू न पिकांच्या उत्पादनात वाढ करावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार शिक्षण विभाग जोमाने कामाला लागला आहे. या अंतर्गत कार्यक्रम दुर्गम भागात राबविण्यात येत आहे.