शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

पाणीटंचाईचा अकोल्यातील उद्योगांना फटका

By admin | Updated: July 3, 2014 01:41 IST

सिमेंट पेव्हर्स, सिट, ब्रीक्स, दरवाजे खिडक्यांच्या उद्योगांवर परिणाम

सचिन राऊत/अकोलाजून महिना संपल्यानंतरदेखील पावसाळय़ातील पाण्याचा कुठलाही थांगपत्ता नसल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत असलेल्या उद्योगांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. पाणीटंचाईचा उद्योगांमधील उत्पादनावर परिणाम झाला असून, सिमेंट सिट, खिडक्या, दरवाजे, ब्रीक्स व पेव्हर्सचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्राबाहेर असलेल्या अनेक उद्योगांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यामुळे काही साहित्यांची भाववाढ करण्यात येणार असल्याची माहिती आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतमधील उद्योगांना खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी चांगला पावसाळा झाल्याने जून महिन्याच्या अखेरपर्यंत उद्योगांना एमआयडीसीकडून पाणी पुरवठय़ाचा प्रयत्न करण्यात येत आहे. एमआयडीसीतील सिमेंटच्या खिडक्या, दरवाजे, ब्रीक्स, सिमेंट सिट, सिमेंट पोल, सिमेंट पाईप, टाइल्स व तार फिनिशिंगसाठीच्या खांब निर्मिती करणार्‍या उद्योगांना पाणीटंचाई भासत आहे. या पाणीटंचाईमुळे सिमेंट उद्योगामधील उत्पादन घटले असून, या साहित्याची दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सिमेंटपासून विविध वस्तूंचे उत्पादन करणारे एमआयडीसीत तब्बल ७0 च्यावर उद्योग असून, तातडीने पाऊस न झाल्यास या उद्योगांवर आणखी मोठा परिणाम होणार असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. एमआयडीसीत सुमारे १२५ दालमिल असून, ऑईल मिल, सोयाबीन प्लांट, प्लास्टिक कंपन्या, फर्टिलायझर, अँग्रो मशिनरीज, कोल डेपो व गोल्ड फिंगरसह पुंगळय़ा कारखान्यांचा समावेश आहे. या उद्योगांना सद्य:स्थितीत करण्यात येत असलेला पाणीपुरवठा काही प्रमाणात समाधानकारक आहे; मात्र जुलै महिना सुरू झाल्यावरदेखील पावसाचे पाणी येत नसल्याने या उद्योगांना देण्यात येत असलेल्या पाण्यात कपात करण्याची शक्यता असल्याने सदरच्या उद्योगांच्या उत्पादनावरही परिणाम होणार आहे. यासोबतच एमआयडीसीबाहेर असलेल्या उद्योगांना आता टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, यामध्ये सिमेंटपासून इतर वस्तूंचे उत्पादन करणारे अधिक उद्योग असल्याची माहिती आहे.