शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील ७,२४१ गावांमध्ये पाणी टंचाई

By admin | Updated: November 23, 2014 00:03 IST

अत्यल्प पावसाचा परिणाम: जमिनीतील पाण्याची पातळी घटली.

खामगाव (बुलडाणा): अत्यल्प पावसामुळे अमरावती विभागातील तब्बल ७,२४१ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. पाणी टंचाई निवारणार्थ राज्याच्या तिजोरीवर यावर्षी कोट्यवधी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे.अतवृष्टीमुळे २0१३ मध्ये अमरावती विभागातील अनेक तालुक्यांमध्ये मुबलक पाणी साठा होता. त्यामुळे विभागातील काही गावे टँकरमुक्त झाली होती. यंदा मात्र अत्यल्प पाऊस पडला. परिणामी विभागातील तब्बल ७,२४१ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती आहे. त्यापैकी बहुतांश गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी राज्यातील काही तालुक्यांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला, तर काही तालुक्यांमध्ये २५ टक्यांपेक्षाही कमी पाऊस पडला. काही तालुक्यांमध्ये ५0 टक्यांच्या आत पाऊस पडला. कमी पावसाच्या पट्टयामध्ये अमरावती विभागातील अमरावती वगळता उर्वरित यवतमाळ, बुलडाणा, अकोला व वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. अत्यल्प पावसामुळे या चार जिल्ह्यांमधील भूजल पातळी घटली आहे. अनेक जलसाठय़ांमध्येही अत्यल्प जलसाठा असल्याने, अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, शासनाला पाणी टंचाई निवारार्थ पर्यायी स्त्रोतांबाबत उपाययोजना करावी लागणार असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करावी लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. *अनेक गावे झाली होती टँकरमुक्त!अतवृष्टीमुळे २0१२-१३ मध्ये विभागातील काही गावांमध्ये ओला दुष्काळ पडला होता. धरणे तुडूंब भरली होती. त्यामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याने, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला होता; मात्र यावर्षी परिस्थिती बिकट असल्यामुळे शासनाला पाणी टंचाई निवारण्यासाठी विशेष तरतूद करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.