संतोष येलकर / अकोलावारंवार उद्भवणार्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी पाऊस पाण्याचे संकलन करून, भूजल पुनर्भरण करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून जिल्हय़ात ह्यजलदेवो भव:ह्ण हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे.वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण आणि कालावधी अनिश्चित झाल्याने, पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे जिल्हय़ाला अवर्षण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, तापत्या उन्हासोबतच अकोला जिल्हय़ातील विविध भागात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहीर व कूपनलिकांचा वापर करता येतो. शहरी आणि ग्रामीण भागात घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाइपचा उपयोग करून संकलित करून शोषखड्डय़ात तसेच कूपनलिकेत सोडल्यास भूजल पुनर्भरण करणे शक्य आहे. तसेच कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणार्या पावसाचा प्रत्येक थेंब मुरविण्यास जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते, त्याचा पीक उत्पादनासाठीही फायदा होतो. या पृष्ठभूमीवर मान्सून कालावधीत पडणार्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरविण्यासाठी जिल्हय़ातील गावागावात सरपंच, ग्रामसेवक व कृषिसेवकांमार्फत १५ जूनपर्यंत ह्यजलदेवो भव:ह्ण हा जलपुनर्भरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी सोमवारी एक परिपत्रक काढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकार्यांसह विविध विभागप्रमुखांना पाठविले.
भूजल पुनर्भरणासाठी अकोला जिल्हय़ात ‘जलदेवो भव:’!
By admin | Updated: April 20, 2016 02:23 IST