शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा धरणात वाढवावे लागेल पाण्याचे आरक्षण!

By admin | Updated: September 6, 2016 02:23 IST

काटेपूर्णा धरणात जलसाठा ८८ टक्के तहानलेल्या गावांना द्यावे लागेल पाणी!

अकोला, दि. ५ : मनपा क्षेत्र वाढल्याने शहरालगतच्या तहानलेल्या गावांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार असल्याने काटेपूर्णा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणातील जलसाठा वाढताच असून, शुक्रवारी या धरणाचा जलसाठा ८८ टक्क्याने वाढला आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, जलसाठा वाढताच शेतकर्‍यांनी आताच खरीप हंगामातील पिकांना पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तर जिल्हय़ातील उमा, निगरुणा धरणे शंभर टक्के भरली असून, पातूर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठा २४.७२ दलघमी म्हणजेच (५९.६२ टक्के) झाला आहे. निगरुणा २८.८५ दलघमी (१00 टक्के) जलसाठा असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा ११.६८ दलघमी (१00 टक्के) आहे. तेल्हारा तालुक्यातील वान ७२.९४ दलघमी (८९.00 टक्के), तर बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या धरणात ४.४८ दलघमी म्हणजेच ४३.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. ३१ लघू प्रकल्पांपैकी २0 प्रकल्प ओव्हर फ्लो आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे धरणात मुबलक जलसाठा संकलित न झाल्याने रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी मिळाले नाही. यावर्षी प्रथमच ८८ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. त्यामुळे पिकांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२४ गावांच्या पाण्याची सोय महापालिकेची हद्दवाढ झाल्याने महापालिका क्षेत्रात आता २४ गावांचा समावेश झाला आहे. या चोवीस गावातील बहुतांश गावात अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. अकोला शहराला लागूनच असलेल्या गुडधी गावात तर अद्यापही पाणी पुरवठा सुरू झाला नसल्याने येथील नागरिकांना वर्षानुवर्षे खारपाणपट्टय़ातील नागरिकांला हातपंपाचे खारे पाणी सेवन करावे लागत आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार आहेत; पण गोडेपाणीच नसल्याने येथील नागरिकांसमोर खार्‍या पाण्याचा पर्याय आहे. या पाण्याचे दुष्परिणाम नागरिकांना सोसावे लागत आहेत. त्यामुळे मन पाला काटेपूर्णा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार असून, या गावांची पिण्याच्या पाण्याची सोयही करावी लागणार आहे.