शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:29 IST

अकोला : गत चोवीस तासांत पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के अशी अल्पशी वाढ झाली आहे.

अकोला : गत चोवीस तासांत पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के अशी अल्पशी वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धासह अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा व वान धरणातही ही वाढ दिसून आल्याने पाणी वाढण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.गेल्या २५ जुलैपासून वºहाडात पाऊस सुरू आहे. तथापि, पावसात जोर नसल्याने चिंता वाढली होती. ३० जुलै ते ३१ जुलै पहाटेपर्यंत चांगला पाऊस झाल्याने अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात एका दिवसात ०.२६ टक्के वाढ झाली, तर वान धरणात ४.६३ टक्के वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पात ३.५ टक्के जो साठा होता, तो आजमितीस ३.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. वान धरणात मंगळवारी ३२.२१ टक्के जलसाठा होता, आजमितीस हा साठा ३६.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा १५.९३ वरू न १६.७९ टक्क्यांवर पोहोचला. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकल्पात ३० जुलै रोजी ३०.९७ टक्के जलसाठा होता, तो आजमितीस ४५.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात २२.५४ वरू न २३.९० टक्के वाढ झाली. नळगंगा प्रकल्पात ९.३६ वरू न ९.५८ टक्के वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण मध्यम प्रकल्पात ४.७३ वरू न ५.१६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. इतरही सिंचन प्रकल्पात वाढ झाली आहे.

खडकपूर्णात शून्य टक्के साठा!वऱ्हाडात ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. ३० जुलै रोजी रात्री बºयापैकी पाऊस पडल्याने या सिंचन प्रकल्पामध्ये अल्पशी वाढ झाली असली तरी बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, कोराडी, वाशिम जिल्ह्यातील सोनल, अकोला जिल्ह्यातील निर्गृणा व उमा प्रकल्पाचा जलसाठा शून्य टक्के आहे. इतर काही धरणांची पातळी अत्यल्प आहे.

 

- सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ आशादायक चित्र असून, आता चांगला पाऊस आल्यास जलसाठ्यात पुन्हा वाढ होणार आहे. असे असले तरी आता उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व बचत करणे गरजेचे आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण